Amitabh shoots at the same spot where he shot for Deewar 46 years ago now shoot may day 
मनोरंजन

बिग बी 46 वर्षानंतर दीवारच्या सेटवर, 'मे डे' च्या शुटिंगसाठी

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - हिंदी चित्रपटांच्या इतिहासात अजरामर झालेला चित्रपट म्हणून दीवारचे नाव घ्यावे लागेल. त्यातील संवाद, कथानक, जबरदस्त अभिनय यामुळे दीवारला अमाप लोकप्रियता मिळाली होती. आजही बॉलीवूडमधल्या सर्वोत्तम 10 चित्रपटांमध्ये दीवारचे नाव घेतले जाते. त्यात महानायक अमिताभ बच्चन, शशी कपूर, निरुपमा रॉय यांच्या प्रमुख भूमिका होत्या. दीवारची आता चर्चा करण्याचे कारण म्हणजे या चित्रपटाचे चित्रिकरण ज्याठिकाणी झाले त्या जागी तब्बल 46 वर्षांनी बिग बी पुन्हा शुटिंग करणार आहेत.

बॉलीवूडमधील एक आयकॉनिक मुव्ही म्हणून दीवारकडे पाहिले जाते. आता दीवार चित्रपटाचे जिथे चित्रिकरण झाले होते तिथे अजय आणि अमिताभ यांच्या मे डे नावाच्या चित्रपटाची शुटिंग सुरु आहे. सध्या हे दोन्ही कलाकार या चित्रपटाच्या चित्रिकरणात कमालीचे व्यस्त आहे. अमिताभ यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेयर करुन त्यात आपण दीवार 1975 आणि आता मे डे 2021 अशा आशयाची एक कॅप्शन दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, Deewar 1975 .. Mayday 2021 .. looking back in time .. the same corridor .. the same location .. so many film shoots here of several films of mine .. but today .. this came up

मे डे ची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. त्याबदद्ल प्रेक्षकांना कमालीची उत्सुकता आहे. जिथं दीवारचे चित्रिकरण सुरु होते आणि मला शशी कपूर यांनी गोळी मारली होती. असे दृश्य याठिकाणी चित्रित करण्यात आले होते. आज त्या घटनेला 42 वर्षे झाली आहेत. हा प्रवास 1979 ते 2021 असा आहे. बच्चन यांचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे. मागील वर्षी मे डे च्या चित्रिकरणाला सुरुवात झाली होती. हैदराबादमध्ये या चित्रपटातील महत्वाचा भाग चित्रित करण्यात आला होता. अजय देवगण या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. अमिताभ आणि अजय यांना पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Shirsat: अंबादास दानवेंनी लावलेली आग अन् फडणवीसांनी केलेला गेम, संजय शिरसाट कसे फसले?

Latest Marathi News Updates : पुण्यात महिलेच्या सूपमध्ये सापडले झुरळ

Pratap Sarnaik: आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर बसणार कारवाईचा चाप, परिवहन मंत्र्यांचे निर्देश

मराठी नाट्य परिषदेतर्फे खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं आयोजन; कुठे कराल अर्ज? वाचा नियम व अटी

API Duty: आता उपचार स्वस्त होणार! औषधांच्या किमतीबाबत सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, कुणाला फायदा?

SCROLL FOR NEXT