Amitabh Bachchan
Amitabh Bachchan  Navya Naveli Nanda
मनोरंजन

अमिताभ यांच्या नातीनं केला कुटुंबाबाबत मोठा गौप्यस्फोट, मला नेहमीच...

सकाळ डिजिटल टीम

बच्चन कुटुंब हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कुटुंबांपैकी एक आहे. त्यांचे प्रत्येक छोटेसे बोलणे किंवा विधान खळबळजनक होते. अशा परिस्थितीत आता अमिताभ बच्चन (Amkitabh Bachchan) यांच्या कुटुंबातील एका सदस्याने मीडियासमोर मोठा खुलासा केला आहे. ही सदस्य दुसरी कोणी नसून त्यांची नात नव्या नवेली नंदा (Navya Naveli Nanda) आहे. एका मुलाखतीत, नव्याने तिच्या कुटुंबातील भेदभाव, आणि तिच्या आणि तिच्या भावासोबत कसा भेदभाव केला जातो याबद्दल खुलेपणाने सांगितले. या खुलास्यानंतर स्टार किड्सनाही या सगळ्याचा सामना सामान्य मुलांप्रमाणेच होतो असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. (Amitabh's granddaughter talked about discrimination in the house, said- 'I am told the household chores not to my brother')

नव्या नवेली नंदा यांची लोकप्रियता कोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. सोशल मीडियावर त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. एका मुलाखतीत बोलत असताना, नव्याने सांगितले होते की घरी कोणीही तिचा भाऊ अगस्त्य काम करेल अशी अपेक्षा ठेवत नाही. ती म्हणाली, "आमच्या घरीही मी भेदभाव पाहिला आहे. आमच्या घरी कोणी पाहुणे आले की, आई मला फक्त हे घेऊन ये किंवा हे कर असे सांगते. माझा भाऊही हे सर्व करू शकतो, पण त्याला कोणी काही बोलत नाही." (Bollywood news)

नव्याने आपले म्हणणे पुढे चालू ठेवत म्हटले, "मला वाटते, अशा घरांमध्ये जिथे सर्वजण एकत्र कुटुंबात राहतात, तिथे घराची जबाबदारी फक्त महिलांवरच टाकली जाते. मग त्यात घर कसे चालवायचे, पाहुण्यांचा पाहुणचार, या गोष्टी आल्याच. वस्तू सांभाळण्याची जबाबदारी फक्त घरच्या मुलीला किंवा सुनेवरच का दिली जाते. घरच्या मुलांना या जबाबदाऱ्या पार पाडताना मी कधी पाहिलं नाही."

बच्चन कुटुंबाची नात फॅशन क्वीन असण्यासोबतच एक एनजीओ देखील चालवते. 'नवेली' असे त्यांच्या प्रकल्पाचे नाव आहे. हे एनजीओ महिलांना पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालण्याची संधीही देते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT