Amol Kolhe On Bailgada Sharyat: Esakal
मनोरंजन

Amol Kolhe On Bailgada Sharyat: 'घाटात घुमणार भिर्रर', अमोल कोल्हेंनी बैलगाडा शर्यतीचा विजय केला यांना समर्पित...पोस्ट व्हायरल

Vaishali Patil

Amol Kolhe On Bailgada Sharyat: ग्रामीण महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्वाची आणि आंनदाची बातमी समोर आली. बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने मोकळी वाट करुन दिली आहे. हा निर्णय आल्यानंतर बैलगाडा शर्यतीच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

यावेळी तामिळनाडूतील जलीकट्टू आणि महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीच्या निकालाचे एकत्रित वाचन करण्यात आले आणि बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे

सर्वच स्थरावरुन या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं तर राजकिय विश्वातुन या निर्णयावर प्रतिक्रियाही आल्या आहेत. त्यातच खासदार अमोल कोल्हे यांनीही आनंद व्यक्त करत या निर्णयावर प्रतिक्रिया दिली.

याविषयी बोलतांना कोल्हे म्हणालेत की, शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस खुप महत्वाचा दिवस असून सगळ्यांच्या प्रयत्नांना यश आल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर त्यांनी आजी माजी दोन्ही सरकारचे आभार मानले. सरकारने सकारात्मक निर्णय दिल्यामुळे आणि शेतकऱ्यांच्या, संघटनांच्या सकारात्मक प्रयत्नांमुळे हे सगळं शक्य झालं. त्यांमुळे सगळ्यांचे आभारही त्याने मानले.

त्याचबरोबर त्यांनी सोशल मिडियावर पोस्ट शेअर करत सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत आणि हा विजय तमाम शेतकरी बांधवांना समर्पित केला.

ते पोस्टमध्ये लिहितात की, 'बैलगाडा मालक, शौकीन व बळीराजाने काळजात जपलेली या मातीतील बैलगाडा शर्यत कायमस्वरूपी सुरू झाल्याबद्दल यावर प्रेम करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन!

या विजयाचं संपूर्ण श्रेय ऐन बंदीच्या काळातही आपल्या बैलांना पोटच्या लेकरांप्रमाणे जीव लावणाऱ्या सर्व बैलगाडा मालकांना जातं! बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी योगदान देणाऱ्या सर्वांचे आभार!' त्याचबरोबर त्यांनी सर्व बैलगाडा मालकांना हा विजय समर्पित केला'

त्यांनी सांगितले की, बैलगाडा शर्यतीवर चित्रपट काढण्याची तयारी सुरु असून लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार . या चित्रपटात बैलगाडा मालकाचे कष्ट, बैलांसोबत असलेलं त्याचं प्रेमळ नातं हे सगळं प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार असल्याचही त्यांनी सांगितलं आहे.

बैलगाडा शर्यतींवरील चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर लवकरच राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक मकरंद माने यांच्या खिल्लार या आगामी चित्रपटात बैलगाडा शर्यत आणि त्याभोवतीचे वातावरण दाखवले जाणार असून, रिंकू राजगुरू आणि ललित प्रभाकर या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Axis Bank Credit Card वापरता? नवे नियम लागू होणार; कधीपासून आणि कोणते? जाणून घ्या...

Mumbai News : झेडपीच्या प्रश्नांवर तोडगा; आरोग्य केंद्र आणि निवासस्थानांचा मार्ग मोकळा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत महत्त्वाचे निर्णय

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंचं ठरलं! मुंबईत नव्हे अंतरवालीतच!! निर्णय का बदलला? अचानक मुंबईत जाण्याची शक्यता

Marathi News Updates : आज राज्यासह देशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Hiwarkhed Accident : पत्रकार किशोर खडे यांचा अपघातात मृत्यू; हिवरखेड-सोनाळा मार्गावर दुचाकींची समोरासमोर धडक

SCROLL FOR NEXT