amruta deshmukh eliminated from Bigg Boss Marathi 4 sakal
मनोरंजन

Bigg Boss Marathi 4: कौतुकानं घात केला!पुण्याची टॉकरवडी अमृता देशमुख घराबाहेर..

'बिग बॉस'च्या घरातून यंदा दोन सदस्य बाहेर.. आता खरा खेळ रंगणार..

नीलेश अडसूळ

bigg boss marathi 4: 'बिग बॉस मराठी' (Bigg Boss Marathi)च्या चौथ्या पर्वातून काल अमृता देशमुख घराबाहेर पडली. स्पर्धकांना यावेळी मोठा धक्का होता, याचे कारण असे की केली काही आठवडे अमृता देशमुखच्या वागण्याचे, खेळण्याचे सातत्याने कौतुक होत आहे. तिला खरा बिग बॉसचा खेळ कळला आहे, बोलले जात होते. त्यामुळे अमृता देशमुख जाईल याचा कुणी विचारही केला नव्हता. अचानक ती अनई अपूर्वा डेंजर झोनमध्ये गेली अनई सगळ्यांचीच झोप उडाली. दोन्हीही तगड्या स्पर्धक असल्याने कोण राहणार कोण जाणार ही ठरवणे कठीण होते, पण मांजरेकरांनी अमृताचे नाव जाहीर केले आणि सर्वांनाच मोठा धक्का बसला..

(amruta deshmukh eliminated from Bigg Boss Marathi 4)

कालच्या एलिमिनेशन साठी विकास सावंत, किरण माने, अमृता धोंगडे, अमृता देशमुख, अपूर्वा नेमळेकर आणि प्रसाद जवादे नॉमिनेटेड होते. त्यापैकी विकास सावंत शनिवारच्या भागात एलिमिनेट झाला. त्यामुळे रविवारी कुणाला नारळ मिळणार याची उत्कंठा प्रेक्षकांना होती तर स्पर्धकांमध्ये भीतीचे वातावरण होते. महेश मांजरेकर यांनी किरण माने अनई अमृता धोंगडे सुरक्षित असल्याचे सांगितले आणि अपूर्वा, अमृता, प्रसाद हे तिघे डेंजर झोनमध्ये आले.

यावेळी प्रसाद जवादे घराबाहेर जाईल असे सर्वांनाच वाटले होते. कारण गेले काही दिवसप्रसादचा खेळ फारसा ठीक राहिलेला नाही तर तो स्वतःही प्रचंड नाराज आहे. मला या घरातून बाहेर जायचं आहे असं तो अनेकदा बोलतो. त्यामुळे तोच घराबाहेर जाईल असे वाटले होते. पण झाले भलतेच. तो सेफ झाला आणि अपूर्वा आणि अमृता देशमुख डेंजर झोन मध्ये आल्या. त्यांनंतर अमृता देशमुख घराबाहेर पडणार हे जाहीर झाले आणि अमृता प्रचंड रडली. तिला हा मोठा धक्का होता. जाताना ती थेट कुणाशी काहीही न बोलता घराबाहेर पडली. अनई मग स्टेजवर जाऊन प्रत्येकाशी तिने संवाद साधला.

अमृता ही अभिनेत्री आहे. शिवाय ती पुण्यामध्ये रेडियो जॉकी म्हणजे आरजे देखील आहे. तिला पुण्याची टॉकरवडी म्हणून ओळखले जाते. बिग बॉस च्या घरात ७५ दिवासात तिने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. तिच्या खेळाचे कौतुकही झाले. प्रसाद आणि अक्षयशी तिचे वेगळे बंध निर्माण झाले. पण अखेर तिला हे घर काल सोडावे लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hockey World Cup, IND vs PAK: भारताकडून गोलचा पाऊस अन् पाकिस्तान आऊट! दणदणीत विजयासह हरमनप्रीतचा संघ पुढच्या फेरीत प्रवेश

Pune Crime: पुणं हादरलं! डोक्यात हातोडा घालून मित्रांनी काढला मित्राचा काटा; विरोधी पार्टीचं स्टेटस ठेवल्याचा राग

Marathi News Live Updates : जातनिहाय जनगणनेच्या बाबतीत अशा प्रकारची फसवणूक का केली जात आहे? - के. सी. वेणुगोपाल

Yamaha RayZR 125 ला नवा लूक! नवीन रंगांसह मिळणार TFT डिस्प्ले आणि नेव्हिगेशन स्मार्ट फीचर्सचा फूल धमाका

Jintur Rescue News: तीन वर्षांचा चिमुकला १५ फूट खोल बोअरवेलमध्ये अडकला; दोन तासांच्या प्रयत्नांनंतर सुखरूप बाहेर

SCROLL FOR NEXT