amruta deshmukhs mother emotional comment prasad jawade reply on post SAKAL
मनोरंजन

Prasad - Amruta: जावई माझा भला! मुलगी सासरी जाण्याच्या कल्पनेत अमृताची आई भावूक. प्रसाद म्हणाला, "लग्नानंतर पण..."

प्रसाद आणि त्याच्या होणाऱ्या सासूबाईंचा संवाद सोशल मिडीयावर व्हायरल झालाय

Devendra Jadhav

Prasad Jawade - Amruta Deshmukh: प्रसाद जवादे आणि अमृता देशमुख यांच्या लग्नाची सर्वांना उत्सुकता सर्वांना आहे. प्रसाद - अमृता यांंचा साखरपूडा काहीच दिवसांपुर्वी झाला. आता दोघेही एकमेकांशी लग्न करण्यात उत्सुक आहेत.

प्रसाद - अमृता एकमेकांचे फोटो सोशल मिडीयावर शेअर करत असतात. दोघे एकमेकांच्या फोटोंवर कमेंट करत असतात. अशातच प्रसादने होणाऱ्या सासूबाई म्हणजेच अमृताच्या आईच्या फोटोखाली केलेली कमेंट चर्चेत आहे.

(prasad jawade reply to amruta deshmukh mother about she emotional)

अमृताची आई लेकीच्या आठवणीने भावूक

झालंय असं की, अमृता सध्या अभिनेता संकर्षण कऱ्हाडे सोबत नियम व अटी लागू या नाटकात काम करतेय. या नाटकाचा सध्या अमेरिका दौरा आहे. अशातच मुलीच्या आठवणीने आई भावूक झालेल्या दिसल्या. त्यांनी अमृतासोबतचा फोटो पोस्ट करुन कॅप्शन लिहीलंय की, नाटकाचा अमेरिका दौरा जरा जास्तच मोठा होता... नाही का.. लग्नाआधीच लेक सासरी गेल्याचा feel येतोय मला.. Miss u soo much अमृता.. भेटू लवकरच...

होणाऱ्या सासूबाईंना प्रसादचा भन्नाट रिप्लाय

अमृताच्या आईच्या फोटो आणि कॅप्शनवर प्रसादने रिप्लाय केलाय की, "लग्नानंतरपण सासरी जाण्याचा feel घेऊ देणार नाही तुम्हाला!!!" प्रसादने केलेला हा रिप्लाय सध्या चांगलाच चर्चेत आहे. अनेकजण जावई असावा तर असा अशा कमेंट करत प्रसादचं कौतुक करत आहेत.

प्रसादने दिलेल्या या रिप्लायवर अमृताने लव्ह रिअॅक्शन दिलंय. याशिवाय ती म्हणाली, "आलेच उरलेले २ प्रयोग ऑनलाइन करते !"

या तारखेला प्रसाद - अमृता करणार लग्न

काही दिवसांपुर्वी प्रसाद - अमृताने साखरपुड्याते फोटो शेयर करत चाहत्यांना गोड बातमी दिली. हे फोटो शेअर करत त्यांनी लिहिलयं की, 'आमचा साखरपुडा झाला आहे, आम्ही अधिकृतपणे कायमस्वरूपी टीम मेंबर म्हणून एकमेकांना नॉमिनेट करत आहोत आणि आमच्या मार्गात येणाऱ्या कोणत्याही टास्कला सामोरे जाण्यासाठी आम्ही तयार आहोत. असं हटके कॅप्शन त्यांने या फोटोला दिलं आहे.

या पोस्टसोबत त्यांनी त्याच्या लग्नाची तारीखही प्रेक्षकांसोबत शेयर केली होती. हे दोघं येत्या 18 नोव्हेंबरला लग्नबंधनात अडकणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway Traffic Jam: मुंबई-पुणे ‘द्रुतगती महामार्गा’वर गॅस टँकर उलटला!, मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प

WPL 2026: जेमिमाहची दिल्ली कॅपिटल्स सलग चौथ्यांदा फायनलमध्ये, गुजरातचा केला पराभव; जेतेपदासाठी RCB शी लढणार

Mumbai Airport incident : मुंबई एअरपोर्टवर भीषण विमान दुर्घटना टळली! ; एअर इंडिया अन् इंडिगो विमानांची पंख एकमेकांना धडकली

मोठी बातमी! ‘टीईटी’त साडेचार लाखातील चार लाख भावी शिक्षक नापास; मराठीचा १२ टक्के तर इंग्रजीचा निकाल ५.४४ टक्के, ३६ जणांचा निकाल ठेवला राखून, वाचा...

Pune Traffic : जेधे चौकात जीव धोक्यात! अतिक्रमण, बेशिस्त वाहनचालकांमुळे पादचाऱ्यांची रोजची कसरत

SCROLL FOR NEXT