amruta deshmukh prasad jawade ukhana video viral wedding date romantic photos SAKAL
मनोरंजन

Prasad - Amruta: प्रसाद जवादे - अमृता देशमुखने केळवणाला पहिल्यांदाच घेतला एकमेकांसाठी उखाणा, व्हिडीओ व्हायरल

अमृता - प्रसादने पहिल्याच केळवणाला एकमेकांसाठी पहिल्यांदाच उखाणा घेतलाय

Devendra Jadhav

Prasad - Amruta Ukhana Video: प्रसाद जवादे - अमृता देशमुख हे मराठी मनोरंजन चर्चेतलं कपल आहे. दोघांच्या घरी लगीनघाई सुरु झालीय. काल २ सप्टेंबरला दोघांनी पहिलं केळवण केलं.

या केळवणाचे फोटो सोशल मिडीयावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. दोघांच्या लग्नाला अजुन दोन महिने असले तरीही दोघांच्या लग्नविधींना सुरुवात झालीय. दोघांनी पहिल्या केळवणाचा आस्वाद घेतला. यावेळी अमृता - प्रसादने पहिल्यांदाच एकमेकांसाठी उखाणा घेतला. त्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालाय.

(amruta deshmukh prasad jawade ukhana video viral)

अमृता - प्रसादने घेतला एकमेकांसाठी झक्कास उखाणा

अमृता - प्रसाद यांनी नुकतंच पहिल्या केळवणाचा आनंद घेतला. त्यानिमित्ताने दोघांनी एकमेकांसाठी फर्मास उखाणा घेतला.

अमृताने उखाणा घेतला की, "नाटकांच्या प्रयोगासाठी फिरते मी वणवण, प्रसादचं नाव घेते आजोबांनी केलं पहिलंच केळवण."

तर दुसरीकडे प्रसादने उखाणा घेतला की, "कितीही वणवण फिरलीस तरी माझे चित्त फक्त तुझ्यापाशी, अमृताचं नाव घेतो आज केळवणाच्या दिवशी"

अमृता - प्रसाद एकमेकांसाठी उखाणा घेतल्यावर एकमेकांंचं खास पदार्थ भरवत तोंड गोड केलं

कोणाच्या घरी झालं अमृता - प्रसादचं पहिलं केळवण

अमृता - प्रसादने पहिलं केळवण कुठे झालं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आम्ही त्याचं उत्तर देतो. अमृताच्या नानांनी म्हणजे आईच्या बाबांनी ८७ व्या वर्षी लाडकी नात अमृतासाठी केळवणाचा घाट घातला होता

अमृता याबद्दल लिहिते, "आजोबांनी (आईच्या बाबांनी) वयाच्या 87 व्या वर्षी सगळं planning करून, भेटवस्तू, बुके ह्या सगळ्यांनी सजवून केळवणाला सुरवात केली..एवढं सगळं झाल्यावर मग "उखाणा घ्या" ह्या ऑर्डर ला नाकारणार कसं."

या तारखेला प्रसाद - अमृता करणार लग्न

काही दिवसांपुर्वी प्रसाद - अमृताने साखरपुड्याते फोटो शेयर करत चाहत्यांना गोड बातमी दिली. हे फोटो शेअर करत त्यांनी लिहिलयं की, 'आमचा साखरपुडा झाला आहे, आम्ही अधिकृतपणे कायमस्वरूपी टीम मेंबर म्हणून एकमेकांना नॉमिनेट करत आहोत आणि आमच्या मार्गात येणाऱ्या कोणत्याही टास्कला सामोरे जाण्यासाठी आम्ही तयार आहोत. असं हटके कॅप्शन त्यांने या फोटोला दिलं आहे.

या पोस्टसोबत त्यांनी त्याच्या लग्नाची तारीखही प्रेक्षकांसोबत शेयर केली होती. हे दोघं येत्या 18 नोव्हेंबरला लग्नबंधनात अडकणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT