amruta deshmukh ukhana with rang maza vegla team for prasad jawade  SAKAL
मनोरंजन

Prasad - Amruta: गुंफू मोत्यांच्या माळा, अमृताने रंग माझा वेगळा टीमसोबत घेतला प्रसादसाठी उखाणा

प्रसाद - अमृताच्या उखाणाचा नवीन व्हिडीओ व्हायरल झालाय.

Devendra Jadhav

Amruta Deshmukh Ukhana for Prasad Jawade: प्रसाद जवादे - अमृता देशमुख हे मराठी मनोरंजन विश्वातील सध्या चर्चेतलं कपल. प्रसाद - अमृता यांच्या लग्नासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

पुढच्या काहीच दिवसात दोघे लग्न करणार आहेत. तत्पुर्वी या दोघांच्या मित्रमैत्रीणी त्यांना केळवण देत आहेत. काहीच दिवसांपुर्वी रंग माझा वेगळा मालिकेच्या टीमने या दोघांना केळवण दिलं. त्यावेळी अमृताने प्रसादसाठी घेतलेला सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झालाय.

अमृताने प्रसादसाठी घेतलेला खास उखाणा

अमृताने प्रसादसाठी घेतलेल्या खास उखाण्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झालाय. या व्हिडीओत अमृताच्या बाजुला प्रसाद बसलेला दिसत असुन संपूर्ण रंग माझा वेगळा मालिकेची टीम दिसत आहे.

या व्हायरल झालेल्या व्हिडीओत अमृता उखाणा घेताना म्हणते, "गुंफू मोत्यांच्या माळा तुझ्या गळा माझ्या गळा, प्रसादचं नाव घेते विथ टीम रंग माझा वेगळा."

असा भन्नाट उखाणा अमृताने घेतला. अमृताने उखाणा घेताच रंग माझा वेगळा मालिकेची टीमने टाळ्या वाजवुन एकच जल्लोष केला.

याआधीही अमृता - प्रसादने घेतला एकमेकांसाठी झक्कास उखाणा

अमृता - प्रसाद यांनी काही दिवसांपुर्वी पहिल्या केळवणाचा आनंद घेतला. त्यानिमित्ताने दोघांनी एकमेकांसाठी फर्मास उखाणा घेतला.

अमृताने उखाणा घेतला की, "नाटकांच्या प्रयोगासाठी फिरते मी वणवण, प्रसादचं नाव घेते आजोबांनी केलं पहिलंच केळवण."

तर दुसरीकडे प्रसादने उखाणा घेतला की, "कितीही वणवण फिरलीस तरी माझे चित्त फक्त तुझ्यापाशी, अमृताचं नाव घेतो आज केळवणाच्या दिवशी"

अमृता - प्रसाद एकमेकांसाठी उखाणा घेतल्यावर एकमेकांंचं खास पदार्थ भरवत तोंड गोड केलं

या तारखेला प्रसाद - अमृता करणार लग्न

काही दिवसांपुर्वी प्रसाद - अमृताने साखरपुड्याते फोटो शेयर करत चाहत्यांना गोड बातमी दिली. हे फोटो शेअर करत त्यांनी लिहिलयं की, 'आमचा साखरपुडा झाला आहे, आम्ही अधिकृतपणे कायमस्वरूपी टीम मेंबर म्हणून एकमेकांना नॉमिनेट करत आहोत आणि आमच्या मार्गात येणाऱ्या कोणत्याही टास्कला सामोरे जाण्यासाठी आम्ही तयार आहोत. असं हटके कॅप्शन त्यांने या फोटोला दिलं आहे.

या पोस्टसोबत त्यांनी त्याच्या लग्नाची तारीखही प्रेक्षकांसोबत शेयर केली होती. हे दोघं येत्या 18 नोव्हेंबरला लग्नबंधनात अडकणार आहे.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

पन्नाशीतही फिट दिसण्यासाठी ऐश्वर्या नारकर फॉलो करतात हे रुटीन ; "कढीपत्त्याचं पाणी आणि डाएटिंग..."

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Yeola Railway Station : येवला रेल्वे स्थानकाची पाहणी; ४ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

SCROLL FOR NEXT