Amruta fadnavis : गेली काही दिवस सुबोध भावेच्या 'बस बाई बस' या आगामी कार्यक्रमाची भलतीच चर्चा आहे. झी मराठी वाहिनीवर येणाऱ्या 'बस बाई बस' या नव्या मालिकेत महिला कलाकार, राजकारणी सहभागी होणार असून या महिला कलाकारांना इतर महिलांच्या मनातले प्रश्न विचारले जात आहेत. अशी भन्नाट संकल्पना असणाऱ्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुबोध भावे (subodh bhave) करत आहे. या कार्यक्रमात या आधी राष्ट्रवादी पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली होती. आता थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस 'बस बाई बस' मध्ये सहभागी होणार आहेत. याचा एक भन्नाट प्रोमो नुकताच समोर आला आहे. ज्यामध्ये अमृता फडवणीस यांनी त्यांच्या 'प्लास्टीक सर्जरी'बाबत मोठा खुलासा केला आहे. हा विडिओ सध्या बराच व्हायरल होत आहे. (amruta fadnavis break the silence about her plastic surgery in bus bai bus show on zee marathi)
देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असले तरी अमृता फडणवीस त्यांच्याहून अधिक चर्चेत असतात. कधी त्यांच्या गाण्यामुळे तर कधी त्याच्या वादग्रस्त विधानामुळे. त्यांचं चाहतावर्ग जितका मोठा आहे तितकाच त्यांना ट्रोल करणारेही मोठ्या प्रमाणात आहे. गेल्या काही वर्षात अमृता फडणवीस बऱ्याच ग्लॅमरस लुक मध्ये समोर आल्या आहेत. त्यामुळे त्यांनी प्लास्टिक सर्जरी केली आहे असे वारंवार बोलले जाते. मध्यंतरी त्यांना बरेच ट्रोल देखील केले गेले. या वादग्रस्त मुद्द्यावर अमृता यांनी अखेर उत्तर दिले आहे.
(deputy cm devendra fadnavis wife amruta fadanvis in bus bai bus show on zee marathi)
तुम्ही प्लास्टीक सर्जरी केली आहे का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर अमृता फडणवीस म्हणाल्या, 'चांगलं झालं, तुम्ही हा प्रश्न मला विचारला. याबाबत मला अनेक लोकांनी ट्रोल देखील केलं आहे. प्लास्टिक सर्जरी करण्यासाठी खूप मोठी किंमत मोजावी लागते. कारण ते करताना जरा जारी काही बिघडलं तरी तुम्हाला भविष्यकाळात त्याचा फटका बसू शकतो. मी लग्नाआधी कधीही ब्युटी पार्लरला देखील जायचे नाही. त्यानंतरही लग्नामध्ये मेकअप करतात तोच माझा पहिला मेकअप होता. देवेंद्रजी पण असे आहेत की ते स्त्री दिसते कशी, तिचा चेहरा कसा यापेक्षा तिचं मन पाहतात.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.