amruta fadnavis in Bigg Boss Marathi s 4 house for diwali celebration sakal
मनोरंजन

Bigg Boss Marathi 4: बिग बॉस मराठीच्या घरात अमृता फडणवीस गाणार का? खास एंट्री!

बिग बॉसच्या घरात आता दर आठवड्यात काही खास पाहुणे येत आहेत.

नीलेश अडसूळ

bigg boss marathi 4: 'बिग बॉस मराठी'मध्ये दिवाळीचे दणक्यात सेलिब्रेशन सुरू आहे. अगदी कंदील बनवण्यापासून ते फराळ खाण्यापर्यंत दिवाळीचा आनंद स्पर्धक लुटत आहेत. नुकतीच या घरात राजवर्धन आणि कावेरी या कलर्स मराठीवरील 'भाग्य दिले तू मला' या लोकप्रिय मालिकेतील कलाकारांनी हजेरी लावली. आता तर चक्क महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडवणीस यांनी हजेरी लावली. आजच्या भागात ही आपल्याला पाहायला मिळेल. या भागात अमृता फडणवीस बिग बॉस मराठीच्या सदस्यांसोबत आनंद लुटताना दिसणार आहेत.

(amruta fadnavis in Bigg Boss Marathi s 4 house for diwali celebration)

बिग बॉस मराठीच्या (bigg boss marathi) घरामध्ये दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो आहे तर त्यानिमित्ताने हा उत्साह द्विगुणित करायला आज घरामध्ये येणार आहेत समाजसेविका, गायिका अमृता फडणवीस. आज घरामध्ये अमृता फडणवीस यांच्या साथीने सदस्य साजरा करणार आहेत दिवाळीचा सण. यावेळी किरण माने आणि यशश्री यांनी अमृता जींना काही प्रश्न देखील विचारले. यशश्रीने विचारले देवेंद्रजींचा फराळातला आवडता पदार्थ कुठला? त्यावर अमृताजी म्हणाल्या त्यांना पोहेतरी खूप आवडते. त्यांना मोदक आवडतात, करंजी आवडते.

त्यावर किरण माने यांनी विचारले, तुम्हांला माहितीच असेल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कॅप्टनपद खूप महत्वाच असते, पण मला तुम्हांला विचारायचे आहे बिग बॉसच्या बाहेर महाराष्ट्र आहे त्याचा कॅप्टन कोण आहे? अमृताजी (amruta fadnavis) म्हणाल्या, मी तुम्हांला दोन नावं सांगते जे महाराष्ट्राचे कॅप्टन आहेत एक प्रॅक्टिकल आणि एक इमोशनल कॅप्टन. श्री. एकनाथ राव शिंदेजी एक कॅप्टन आहेत आणि एक देवेंद्र फडणवीसजी आहेत.' याशिवाय अमृता फडणवीस बिग बॉस मराठीच्या घरात गाणार का? किंवा कोणतं गाणं गाणार ही आजच्या भागात कळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT