मनोरंजन

नवा लूक, नवं गाणं; अमृता फडणवीसांची चाहत्यांसाठी खुशखबर

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सातत्याने चर्चेत असतात. त्या आपल्या स्वतंत्र मतांसाठी प्रसिद्ध आहेत. नवनवी गाणी गाऊन त्या प्रेक्षकांचं मनोरंजनही करत असतात. त्यांच्या या गाण्यांवर काहीवेळा टीका आणि ट्रोलिंगही होताना दिसून येतं. मात्र, तरीही अमृता फडणवीस या साऱ्या प्रकाराला दुर्लक्षित करुन नवनवी गाणी घेऊन येताना दिसतात. आता त्यांच्या चाहत्यांसाठी नवी खुशखबर आहे. कारण अमृता फडणवीस आता नवं गाणं घेऊन येत आहेत. या व्हॅलेंटाईन दिनानिमित्त त्यांनी ही घोषणा केली आहे.

विशेष म्हणजे व्हॅलेंटाईन दिनादिवशी घोषणा केलेलं हे गाणं भगवान शिवशंकराचं असण्याची शक्यता आहे. कारण त्यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर शंकराच्या अवतारात स्वत:चाच फोटो टाकला आहे. त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलंय की, मी तुझी निवड आता आणि कायमस्वरूपी केली आहे. तू माझ्या हृदयात आहेस, माझ्या मनात, माझ्या आत्म्यात, विश्वासात आणि श्वासातही आहेस. हा व्हॅलेंटाईन डे जो आपल्या जवळच्या व्यक्तींच्या प्रेमासाठी ओळखला जातो, त्या दिवशी मी माझ्या रुद्राला एक संगीतमय स्तुती अर्पण करतेय. पुढे त्यांनी #valentine #lordshiva असे दोन हॅशटॅगही दिले आहेत. तसेच लवकरच येत असल्याची घोषणाही केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

Video : दैव बलवत्तर! छतावरुन कोसळणाऱ्या चिमुकल्याला कसोशीने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल

Pune Weather Update : बारामतीकरांनी अनुभवला उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस

Virat Kohli GT vs RCB : मी गेली 15 वर्षे खेळतोय याला काहीतरी... विराट स्ट्राईक रेटवरून बोलणाऱ्यांना दिलं कडक उत्तर

Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT