amruta khanvilkar, amruta khanvilkar news, amruta khanvilkar husband, amruta khanvilkar family SAKAL
मनोरंजन

Amruta Khanvilkar Video: प्रेम आणि काळजी.. नवऱ्याच्या वाढदिवसाला अमृता झाली भावुक

अमृताने हिमांशूसाठी शानदार पार्टीचे आयोजन केले होते

Devendra Jadhav

Amruta Khanvilkar News: मराठी इंडस्ट्रीतील लावण्यवती चंद्रा म्हणजेच अमृता खानविलकर. अमृताचा नवरा हिमांशु रॉयचा आज वाढदिवस. अमृताने हिमांशू साठी खास पार्टी आयोजित केली होती. यावेळी अमृता आणि हिमांशूचे मित्र मैत्रीण उपस्थित होते.

अमृताने हिमांशूसाठी शानदार पार्टीचे आयोजन केले होते. अमृता खूप आनंदात दिसत होती. अमृताने व्हिडिओ शेयर करत हिमांशूसाठी खास पोस्ट शेयर केली आहे.

(amruta khanvilkar emotional post about her husband himanshu roy birthday)

अमृता व्हिडिओ शेयर करून लिहिते.. हॅपी बर्थडे हिमी.. हा दिवस आपल्या सर्वांसाठी खूप खास आहे जे तुझ्यावर प्रेम करतात... तुझा आदर करतात ….

तू सगळ्यामध्ये राहूनही वेगळा आणि मौल्यवान आहेस…. तुम्हाला नेहमीच माहीत असलेली एक भावना म्हणजे "देणे"…. मग ते प्रेम असो… काळजी… क्षमा आणि बरेच काही..

अमृता पुढे लिहिते.. माझ्या आयुष्यात आल्याबद्दल आणि जीवनाच्या प्रत्येक प्रसंगात सतत सोबत राहिल्याबद्दल धन्यवाद खरंच तुझ्यासारखा कोणीच नाही, माझ्या जिवलग मित्रा …… वाढदिवसाच्या शुभेच्छा..

अशी पोस्ट लिहून अमृताने हिमांशूला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. याशिवाय या पार्टीला उपस्थित राहिलेल्या सर्व मित्रमैत्रिणींचे आभार मानले आहेत.

या व्हिडिओत अमृता एकदम आनंदात असून हिमांशू तिच्या गालावर प्रेमाने पप्पी घेत आहे. हिमांशू आणि अमृता २००४ ला सिनेस्टार कि खोज या रिऍलिटी शो मधून एकत्र आले होते.

अमृता आणि हिमांशू तिथे पहिल्यांदा एकमेकांचे मित्र बनले. आणि पुढे १० वर्ष एकमेकांना डेट केल्यावर अमृता २४ जानेवारी २०१५ ला या दोघांनी एकमेकांशी लग्न केलं.

अमृताचा २०२२ ला आलेला चंद्रमुखी सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला. आता अमृता तिच्या आगामी कलावती सिनेमाचं शूटिंग करतेय. काहीच दिवसांपूर्वी कलावती सिनेमाचं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलंय.

यात पडद्याआड अमृता खानविलकरची रहस्यमय नजर दिसतेय. कलावती मध्ये दिग्गज कलाकारांची फौज असून अमृताची जोडी महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम ओंकार भोजने सोबत जमणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

Dattatraya Meghe Passes Away: लोकसेवेचा वटवृक्ष निमाला! माजी खासदार, लोकनेते दत्ता मेघे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, विविध क्षेत्रात हाेता दबदबा..

Pune Accident: पुण्यातील मुथाळणे घाटात शेतमजूरांची पिकअप पलटली; एक गंभीर तर १८ किरकोळ जखमी!

Latest Marathi News Update : राज्यासह देशभरात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT