Amruta subhash,Anurag Kashyap esakal
मनोरंजन

Amruta subhash: "मला मासिक पाळी आली होती, तेव्हा अनुराग ..."; अमृतानं सांगितला इंटिमेट सीन शूट करताना आलेला अनुभव

एका मुलाखतीत अमृतानं शूटिंगदरम्यान आलेले अनुभव सांगितले आहेत. अमृतानं या मुलाखतीत इंटिमेट सीन्स शूट करताना आलेल्या अनुभवाबद्दल देखील सांगितलं आहे.

priyanka kulkarni

Amruta Subhash : मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील चतुरस्त्र अभिनेत्री अमृता सुभाष (Amruta Subhash) ही तिच्या अभियानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. अमृता ही नाटक, वेब सीरिज आणि चित्रपट या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येते. नुकतीच मित्र म्हणे या युट्यूब चॅनलला अमृतानं मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत अमृतानं शूटिंगदरम्यान आलेले अनुभव सांगितले आहेत. अमृतानं या मुलाखतीत इंटिमेट सीन्स शूट करताना आलेल्या अनुभवाबद्दल देखील सांगितलं आहे.

काय म्हणाली अमृता?

अमृतानं सेक्रेड गेम्स या वेब सीरिजमधील इंटिमेट सीन्सबद्दल सांगितलं ती म्हणाली, "अनुराग कश्यपच्या सेक्रेड गेम्स या वेब सीरिजमध्ये इंटिमेट सीन होता. तेव्हा अनुरागनं चित्रपटाच्या टीमला सांगितलं होतं की, अमृताला याबद्दल कोणी सांगायचं नाही, तिला मीच सांगणार. मग त्यानं मला भूमिकेबद्दल सांगितलं आणि इंटिमेट सीन्सबद्दल सांगितलं."

पुढे अमृतानं सांगितलं, "दिग्दर्शिकेसोबत काम करायला कम्फर्ट असतोच पण अनुरागनं स्त्री म्हणून मला समजून घेतलं. जेव्हा सेक्रेड गेम्सचं शूट सुरु होतं, तेव्हा मला मासिक पाळी आली होती, अनुराग तेव्हा त्याच्या टीमला ओरडला होता. तो म्हणाला होता की, अभिनेत्रींना हे तुम्ही विचारायला पाहिजे कारण मासिक पाळी असताना ती हा सीन कसा शूट करेल? नंतर शूटिंगचं शेड्युल लावताना मला माझी पिरियड्स सायकल विचारली जाऊ लागली."

'लस्ट स्टोरीस्ट-2' बद्दल अमृतानं सांगितलं

लस्ट स्टोरीज-2 या चित्रपटातील इंटिमेट सीन्सबद्दल अमृता म्हणाली, "श्रीकांत यादव हा माझा खूप जुना मित्र आहे. तो या फिल्मसाठी तयार होत नव्हता. तो म्हणाला, तुझ्यासोबत मी इंटिमेट सीन नाही शूट करु शकत. संदेशनं (अमृताचा पती) श्रीकांतला फोन करुन सांगितलं की, चांगली भूमिका तू सोडू नको. त्यानंतर श्रीकांत ती भूमिका साकारण्यासाठी तयार झाला."

"एका चित्रपटात किसिंग सीन होता. तेव्हा मी पहिला फोन संदेशला केला. तेव्हा तो मला म्हणाला लाजू नको.पण तो चित्रपट रिलीज झाला नाही.", असंही मुलाखतीत अमृता म्हणाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शांतता कराराची घोषणा पण ट्रम्पसमोर इराणच्या ३ मोठ्या अटी, अमेरिका-इराण डीलमध्ये १४ मुद्दे महत्त्वाचे

Fifa World Cup 2026: ब्राझीलला बरोबरीचेच समाधान; मोरोक्कोसमोर पाच वेळच्या विजेत्यांचा कस, व्हिनिसियसच्या गोलने दिलासा

Pune Solapur Highway Traffic : पुणे-सोलापूर महामार्गावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी, वाहनांच्या ६ किलोमीटरपर्यंत रांगा; प्रवाशांचे प्रचंड हाल

Latest Marathi News Live Update : उन्हाळी सुटीनंतर राज्यातील ज्ञानमंदिरे आजपासून पुन्हा गजबजणार; चिमुकल्यांना पहिल्या दिवसाची उत्सुकता

Kasba Beed Gold Coins : शिलाहार राजवंशाची उपराजधानी असलेल्या कोल्हापूरच्या 'या' गावात पुन्हा सापडल्या सुवर्णमुद्रा! काय आहे अतिप्राचीन 'बेडा' आणि त्रिशूळाचे रहस्य?

SCROLL FOR NEXT