Deepika Padukone and Ranveer Singh esakal
मनोरंजन

Deepika Padukone: अनंत अंबानी- राधिकाच्या 'प्री वेडिंग' फंक्शनमध्ये 'मॉम टू बी' दीपिकाचा जबरदस्त डान्स; व्हिडीओ व्हायरल

Deepika Padukone and Ranveer Singh: मॉम टू बी दीपिकानं रणवीरसोबत अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये 'गल्लां गूडियां' या गाण्यावर डान्स केला आहे.

priyanka kulkarni

Deepika Padukone and Ranveer Singh: अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट ( Radhika Merchant) यांच्या प्री-वेडिंग फंक्शनच्या दुसऱ्या दिवशी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी परफॉर्म केलं. शाहरुख खान (Shah Rukh Khan), सलमान खान (Salman Khan) आणि आमिर खान (Aamir Khan) यांनी नाटू नाटू या गाण्यावर डान्स केला. तर आता मॉम टू बी दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) यांच्या डान्सचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

'गल्लां गूडियां' गाण्यावर दीपिका आणि रणवीरनं केला डान्स

मॉम टू बी दीपिकानं डॅड टू बी रणवीरसोबत अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये 'गल्लां गूडियां' या गाण्यावर डान्स केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये रणवीर आणि दीपिका हे दांडिया खेळताना देखील दिसले.

पाहा व्हिडीओ:

दीपिका आणि रणवीरचा खास लूक

दीपिका आणि रणवीर यांनी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग फंक्शनसाठी खास लूक केला होता. रणवीरनं निळ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती, तर दीपिकानं लेहेंगा परिधान केला होता.

अनंत अंबानी आणि राधिका यांच्या प्री-वेडिंग फंक्शनला सैफ अली खान, जान्हवी कपूर, अजय देवगण, शाहरुख खान, आलिया भट्ट, करीना कपूर यांनी देखील हजेरी लावली.

दीपवीर होणार आई-बाबा

दीपिका आणि रणवीर यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करुन चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं, "सप्टेंबर 2024". दीपिका ही सप्टेंबर महिन्यात बाळाला जन्म देणार आहे. दीपिका आणि रणवीरच्या या पोस्टला कमेंट्स करुन नेटकऱ्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT