Anant ambani engagement Cartier Brooch know about its price and design  esakal
मनोरंजन

अंबानींचा विषय वेगळा.. साखरपुड्यात लावलेल्या 'कार्टियर पैंथर ब्रोच' चाही आहे इतिहास

साखरपुड्यापेक्षा अनंत अंबानीच्या कोटवरील 'कार्टियर पैंथर ब्रोच' ची चर्चा अधिक

सकाळ डिजिटल टीम

उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीचा साखरपुडा नुकताच पार पडला आहे. अनंत अंबानीचा साखरपुडा राधिका मर्चंटशी झाला आहे. त्या दोघांच्या साखरपुड्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. मात्र, त्याच्या साखरपुड्यापेक्षा अनंत अंबानीच्या कोटवरील 'कार्टियर पैंथर ब्रोच' ची चर्चा अधिक रंगली आहे.(Anant ambani engagement Cartier Brooch know about its price and design )

साखरपुड्यासाठी राधिका मर्चंटने लोकप्रिय डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला यांनी डिझाइन केलेले मॅचिंग ब्लाउज आणि दुपट्ट्यासह सानुकूल गोल्ड सिल्क टिश्यू घागरा परिधान केला होता. यामध्ये ती खुपच सुंदर दिसत होती.

तर दुसरीकडे अनंतने यावेळी गडद निळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता. त्याच्या कुर्त्यावर परिधान कोटवर 'कार्टियर पँथर ब्रोच' चिकटवले होते. तर या ब्रोचची चर्चा अधिक रंगली आहे. या 'कार्टियर पँथर ब्रोच'चा एक इतिहास आहे.

'कार्टियर पँथर ब्रोच' हा प्लॅटिनम किंवा सोन्याच्या धातूत तयार होतो. याला ब्रोचला हिऱ्यांनी मडवले जाते.

'कार्टियर पैंथर ब्रोच' आमतौर पर प्लैटिनम या सोने में बने होते हैं और इनके ऊपर हीरों को जड़ा जाता है. पँथर रोझेट्स काबोचोन कट गोमेद पासून बनवले जातो. तर चमकणारे डोळे पाचूचे बनवण्यात आलेले असतात.

'पँथेरे डी कार्टियर' लोकांना स्वतःकडे आकर्षित करते. या ब्रोचची किंमत १,१३,५१,०८७ पासून १,३२,२६,०८५ इतकी आहे. १९१४ मध्ये Jacques Cartier यांनी डिझाईन केली आहे. या पँथर ब्रोचची रचना कार्टियरच्या तिसऱ्या पिढीतील जॅक कार्टियर यांनी केली होती. पँथरचा उपयोग सामर्थ्य आणि सामर्थ्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी केाला जातो आणि ब्रोचमध्ये या समान वैशिष्ट्यांचा समावेश असल्याचे म्हटले जाते.

रेड कार्पेटवरही झळकलय ब्रोच

रेड कार्पेटवरही हे ब्रोच झळकले आहे. अनेक सेलिब्रिटींनी ते त्यांच्या सूट किंवा ड्रेसवर लावले होते. हे अँजेलिना जोली, केट ब्लँचेट आणि सारा जेसिका पार्कर सारख्या सेलिब्रिटींनी परिधान केले होते. याशिवाय, जगभरातील नववधूंसाठी ही एक लोकप्रिय गोष्ट बनली आहे.

वर्ल्ड युनिव्हर्सिटी ऑफ डिझाईनच्या मते, कार्टियरच्या निर्मितीमध्ये अनेक वर्षांपासून विविध प्राण्यांचे चित्रण करण्यात आले आहे. यामध्ये, सिंह, वाघ, अस्वल, फुलपाखरे, साप, कासव यांचे ब्रोच बनवले होते. एक काळ असा होता की वटवाघळांचा आकार शतकानुशतके वापरला जात असे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT