Anant Ambani Radhika Mechant Pre Wedding thats why Happening in jamnagar know reason Sakal
मनोरंजन

Anant-Radhika Wedding: अनंत-राधिकाचा प्री-वेडिंग सोहळा जामनगरमध्येच का? पंतप्रधान मोदी आहेत कारण

Anant Ambani Radhika Mechant Pre Wedding: देशातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरी लग्नसराई सुरु आहे. अंबानी कुटुंबाचा धाकटा मुलगा अनंत अंबानी राधिका मर्चंटसोबत लग्नगाठ बांधणार आहे. लग्नाआधी त्या दोघांचे प्री-वेडिंग फंक्शन्स सुरू होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Anant Ambani Radhika Mechant Pre Wedding: देशातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरी लग्नसराई सुरु आहे. अंबानी कुटुंबाचा धाकटा मुलगा अनंत अंबानी राधिका मर्चंटसोबत लग्नगाठ बांधणार आहे. लग्नाआधी त्या दोघांचे प्री-वेडिंग फंक्शन्स सुरू होणार आहे. ज्यासाठी गुजरातमधील जामनगर शहराची निवड करण्यात आली आहे.

मुकेश अंबानी त्यांच्या धाकट्या मुलाचे लग्न परदेशात करू शकले असते, पण यासाठी त्यांनी गुजरातमधील जामनगरची निवड का केली, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल? या प्रश्नाचे उत्तर अखेर अनंत अंबानी यांनी दिले आहे. गुजरातमधील जामनगरशी त्यांच्या कुटुंबाचा जुना संबंध असल्याचे त्यांनी सांगितले. प्री-वेडिंगसाठी ही जागा का निवडली हे त्यांनी स्वतः सांगितले आहे.

अंबानी कुटुंबाचा जामनगरशी काय संबंध आहे?

अलीकडेच अनंत अंबानी यांनी इंडिया टुडेला एक मुलाखत दिली त्यात त्यांनी सांगितले की 'माझ्या आजीचा जन्म इथे झाला. माझ्या आजोबांनी येथूनच व्यवसाय सुरू केला आणि माझे वडीलही जामनगरमध्ये आजोबांसोबत काम करत होते. मी इथेच मोठा झालो आहे.

अनंत अंबानी पुढे म्हणाले की, 'म्हणूनच आम्ही हे ठिकाण निवडले आहे. माझे वडील आणि आजोबांचे कामाचे ठिकाण आहे. त्यामुळे आम्ही इथे सेलिब्रेट करत आहोत हे माझे आणि राधिकाचे भाग्य आहे.

मुकेश अंबानी यांचे वडील धीरूभाई अंबानी जामनगरचे आहेत. मुकेश अंबानी यांच्या आई कोकिलाबेन अंबानी यांचाही जन्म जामनगरमध्ये झाला होता. जामनगरमध्ये अंबानी कुटुंबाचे वडिलोपार्जित गाव आहे. पण जामनगरमध्ये लग्नापूर्वीचा सोहळा आयोजित करण्यामागचं कारण फक्त एवढ्यापुरतं मर्यादित नसून त्याचा पंतप्रधान मोदींशीही संबंध आहे. ज्याचा खुलासा खुद्द अनंत अंबानी यांनी केला आहे.

अनंत अंबानी म्हणाले, आदरणीय पंतप्रधान म्हणाले होते की आपल्याच देशात प्रत्येकाने लग्न केले पाहिजे आणि हे माझे घर आहे. माझे वडील अनेकदा सांगतात की जामनगर आमच्या आजोबांचे घर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shirol Kolhapur village dispute : कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यात एका झाडावरून दोन गावात वाद उफाळला, वडाच्या झाडावरून तणावपूर्ण स्थिती

A. Krishnamurthy: 'हिम्मतवाला' फेम ज्येष्ठ चित्रपट निर्मात्यांचे निधन, सिनेसृष्टीवर शोककळा

Konkan Hapus Mango Crisis : चक्रीवादळ ते अवकाळी पाऊस; जागतिक कीर्तीचा हापूस आंबा आता धोक्यात? वाचा सविस्तर रिपोर्ट

प्रेमासाठी धर्म बदलायला तयार होती नयनतारा, मग का नाही झालं प्रभुदेवाशी लग्न? 'त्या' अटींमुळे होत्याचं नव्हतं झालं

iPhone 17 मिळतोय निम्म्या किंमतीत! ४४ हजारात खरेदीसाठी रांगा; कुठे सुरुय ही अजब ऑफर? पाहा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT