Anant-Radhika Engagement  esakal
मनोरंजन

Anant-Radhika Engagement : 'अंबानींच्या घरचं लग्न, किमान बुटांना पॉलिश तरी करायची!'

देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे चिरंजीव अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा साखरपुडा सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंगचा विषय आहे.

सकाळ डिजिटल टीम

Anant Ambani - Radhika Merchant Engagement : देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे चिरंजीव अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा साखरपुडा सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंगचा विषय आहे. त्यांच्या साखरपुड्याला बॉलीवूडमधील वेगवेगळे सेलिब्रेटी उपस्थित होते. त्यामध्ये रणवीर सिंग आणि दीपिकाच्या इंट्रीनं साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या साखरपुड्याच्या सोहळ्यात कित्येक बॉलीवूडचे सेलिब्रेटी सहभागी झाले होते. त्यामध्ये दीपिका पदुकोण, रणवीर सिंगचा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियेचा विषय आहे. बॉलीवूडमधील सर्वाधिक चर्चेतील लोकप्रिय जोडी म्हणून दीपिका-रणवीरकडे पाहिले जाते. यावेळी दीपिकानं गोल्डन रंगाची साडी परिधान केली होती. त्यामध्ये ती कमालीची सुंदर दिसत होती.

Also Read - मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

दीपिकाची ज्वेलरी देखील चाहत्यांच्या चर्चेचा विषय होता. यावेळी त्या सोहळ्यामधील प्रमुख आकर्षण म्हणून त्यांच्याकडे साऱ्यांच्या नजरा खिळल्या होत्या. रणवीरच्या लूकबाबत बोलायचे झाल्यास त्यानं ब्लॅक रंगाचा शायनी कुर्ता परिधान केला होता. त्यामध्ये तो कमालीचा सुंदर दिसत होता. त्याच्या त्या रॉयल लूकची नेटकऱ्यांनी स्तुती केली आहे.

साडीमध्ये अनकंम्फर्टेबल त्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रणवीर दीपिका दिसत आहे. दीपिकानं परिधान केलेली साडी ही तिला सावरताना अडचण होताना दिसतंय.त्यावेळी रणवीरनं घेतलेला पुढाकार यामुळे चाहत्यांनी आणि नेटकऱ्यांनी तिच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे. त्याचवेळी काहींनी रणवीरच्या बुटांकडे पाहून त्यावरुन कमेंटसही केल्या आहेत. त्या व्हायरल झाल्या आहेत.

दीपिकानं रणवीरचे शुज पाहिल्यानंतर कदाचित असे म्हटले असेल की, आपण अंबानींच्या लग्नात जातो आहोत तेव्हा किमान आपल्या शूजला पॉलिश तरी करुन यायचे. यामुळे तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसून आहे. रणवीर हा दीपिकाच्या साडीकडे पाहत असून त्यानंतर दीपिकानं आपल्या पेहरावाकडे अधिक लक्ष दिल्याचेही त्या व्हिडिओमध्ये दिसत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT