Anant Ambani- Radhika Merchant Engagement Video Google
मनोरंजन

Anant Ambani- Radhika Merchant च्या साखरपुड्यात घरातील कुत्र्यानं पार पाडला 'हा' विधी..पहा व्हिडीओ

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या साखरपुडा सोहळ्यातील अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.

प्रणाली मोरे

Anant Ambani- Radhika Merchant Engagement Video: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या गोल-धना म्हणजेच साखरपुड्याच्या सोहळ्यातले कितीतरी फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

बॉलीवूडमधनं शाहरुख खान,सलमान खानपासून ते दीपिका पदूकोण,ऐश्वर्या राय-बच्चन पर्यंत सगळेचजणं या सोहळ्याचा भाग राहिले . तर अंबानी कुटुंबानं देखील बॉलीवूडच्या गाण्यांवर धमाल डान्स केला.

एका व्हिडीओ क्लीपमध्ये संपूर्ण अंबानी कुटुंब 'वाह-वाह रामजी' गाण्यावर थिरकताना दिसले. तर यासगळ्यासोबत आणखी एक इंट्रेस्टिंग क्लीप समोर आली आहे,ज्यात अनंत-राधिकासाठी त्यांचा घरातील कुत्रा अंगठी घेऊन येताना दिसला. (Anant Ambani- Radhika Merchant Engagement Video dog was the ring bearer in ceremony)

मुकेश अंबानीचा छोटा मुलगा अनंत अंबानीचा साखरपुडा त्याची गर्लफ्रेंड राधिका मर्चंटशी झाला आहे. हा सोहळा अंबानीच्या घरीच मोठ्या थाटात पार पडला. सोहळ्यातला एक व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

यामध्ये मुकेश अंबानींची मुलगी ईशा अंबानी राधिकाकडे इशारा करत अंगठी हरवलीय की काय अशा अंदाजात बोलताना दिसते. पण त्यावेळी तिला खात्री देताना दिसते की त्यांच्याकडे आणखी एक रिंग तशीच आहे,जे सरप्राइज आहे.

एवढ्यात अंबानीच्या घरातील कुत्रा येतो,ज्याच्या पाठीवर बांधलेली रिंग दिसते,कुत्र्याला पाहून अनंत खूश होतो आणि त्याच्या पाठीवर बांधलेली रिंग काढून घेतो. यानंतर संपूर्ण कुटुंब 'देवा-देवा गाण्यावर' एकच ताल धरताना व्हिडीओत दिसत आहेत.

एका व्हिडीओत अनंत आणि राधिका एकमेकांचा हाथ पकडून उभे दिसतात. यानंतर मुकेश-नीता अंबानी आपला मोठा मुलगा आणि सून तसंच मुलगी-जावयासोबत स्टेजवर येतात. आणि यानंतर सगळेच अनंत आणि राधिकाला शुभेच्छा देतात.

अंबानी कुटुंबाकडून जारी करण्यात आलेल्या स्टेटमेंटनुसार अनंत आणि राधिकाच्या साखरपु्ड्यात 'गोल धना' आणि 'चुनरी विधी' सारख्या गुजराती विधी पार पडल्या. संध्याकाळी ईशा आणि इतर अंबानी कुटुंबातील सदस्य राधिकाच्या घरी गेले आणि त्यांना निमंत्रण दिले. यानंतर सगळेच कुटुंबातील सदस्य देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी कृष्णाजी मंदीरात गेले. सोहळ्याची सुरुवात गणेशाच्या पूजेनं झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray targets Mumbai Mayor : बांगलादेशी घुसखोरांवरून आदित्य ठाकरेंचा मुंबईच्या महापौरांना टोला अन् भाजपला सवाल, म्हणाले...

Valentine Day 2026 Marathi Wishes: 'व्हॅलेंटाईन डे' निमित्त तुमच्या प्रेमळ व्यक्तीला पाठवा हृदयस्पर्शी शुभेच्छा, प्रेमाचा दिवस बनेल स्पेशल

Indian Passport Ranking : भारतीय 'पासपोर्ट रँकिंग'मध्ये मोठी सुधारणा!, आता ५६ देशांमध्ये 'Visa-Free' एन्ट्री करता येणार

USA vs NED : अमेरिकेच्या विजयात पुणे, मुंबईचे खेळाडू चमकले; नेदरलँड्सचा पराभव पाकिस्तानच्या पथ्यावर, अ गटाचे चित्र स्पष्ट

अभ्यास करा..! पाचवी अन्‌ आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा २२ फेब्रुवारीला; परीक्षेत दोन पेपर, १५० गुणांचा वस्तुनिष्ठ प्रश्न, वाचा...

SCROLL FOR NEXT