Anant Ambani Radhika Merchant pre wedding esakal
मनोरंजन

Anant Ambani Radhika Merchant: कलाकारांपासून नेत्यांपर्यंत.. अनंत आणि राधिकाच्या प्रीवेडिंग फंक्शनला आतापर्यंत कोण-कोण पोहोचलं?

अनंत आणि राधिका यांच्या प्री-वेडिंग फंक्शन्ससाठी कोण-कोण जामनगरमध्ये पोहोचलं आहे? याबद्दल जाणून घेऊयात...

priyanka kulkarni

Anant Ambani-Radhika Merchant Pre-Wedding Bash: गुजरातमधील जामनगरमध्ये अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांच्या प्री-वेडिंग फंक्शन्सला सुरुवात झाली आहे. या फंक्शन्सला बॉलिवूड कलाकार तसेच नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत. अनंत आणि राधिका यांच्या प्री-वेडिंग फंक्शन्ससाठी कोण-कोण जामनगरमध्ये पोहोचलं आहे? याबद्दल जाणून घेऊयात...

जामनगरमध्ये पोहोचले ठाकरे कुटुंब

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग फंक्शन्ससाठी ठाकरे कुटुंब जामनगरमध्ये पोहोचले आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे हे जामनगरमध्ये पोहोचले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या देखील जामनगरला अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग फंक्शन्ससाठी गेल्या आहेत. जामनगरमध्ये अमृता फडणवीस यांनी पापाराझींना फोटोसाठी पोज दिल्या.

बॉलिवूड कलाकार पोहोचले जामनगरला

बॉलिवूडमधील अनेक कलाकार अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग फंक्शन्ससाठी जामनगरमध्ये पोहोचले आहेत. रणवीर सिंह, दीपिका पादुकोण, ऑरी, दिग्दर्शक अॅटली, गायक रिहाना, राणी मुखर्जी, अर्जुन कपूक, शाहरुख खान हे कलाकार अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगसाठी जामनगरला गेले आहेत.

राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांच्या प्री-वेडिंग फंक्शन्सला 'अन्न सेवा' कार्यक्रमानं सुरुवात झाली. हा कार्यक्रम जामनगरमधील रिलायन्स टाउनशिपजवळील जोगवाड गावात झाला. जिथे मुकेश अंबानी, अनंत अंबानी, राधिका मर्चंट आणि अंबानी कुटुंबातील इतर सदस्यांनी गावकऱ्यांना गुजराती जेवण दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bullet Rider Assaults Traffic Police in Solapur : लायसन्स, नंबरप्लेट नाही, मॉडिफाइड सायलेन्सर, तरीही पोलिसाला खल्लास करण्याची दिली धमकी

Latest Marathi News Live Update : बिबट्याची भीती, उन्हाचा तडाखा अन् गारपिटीचा फटका; मेंढपाळ अडचणीत

Hacking Safety Tips : हॅकर्स करणार गुन्हा अन् तुम्ही जाल तुरुंगात! घरातली 'ही' स्वस्त वस्तु तुम्हाला बनवत आहे अपराधी? आजच करा चेक

तुझी जात काय? भर सेटवर अभिनेत्याने विचारला प्रश्न; 'अग्गंबाई सुनबाई' फेम अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली-

Pune Police Recruitment : पोलिस भरतीत ‘शॉर्टकट’चा स्फोट! शक्तीवर्धक पेय घेताच उमेदवाराचा मैदानावर धिंगाणा, थरारक क्षणांनी सर्वच शॉक

SCROLL FOR NEXT