anant ambani says family follows sanatan dharma no interest in politics
anant ambani says family follows sanatan dharma no interest in politics Sakal
मनोरंजन

Anant Ambani: 'अंबानी कुटुंबाचा सनातन धर्मावर विश्वास', राजकारणात येणार? अनंत अंबानी म्हणाले...

सकाळ वृत्तसेवा

Anant Ambani: देशातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. अनंत अंबानी राधिका मर्चंटसोबत नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहे. त्यांचे प्री-वेडिंग फंक्शन गुजरातमधील जामनगर येथे 1 ते 3 मार्च या दरम्यान होणार आहे.

यानंतर अनंत-राधिका जुलैमध्ये लग्न करणार आहेत. लग्नापूर्वी अनंत अंबानी यांनी जगातील सर्वात मोठे प्राणीसंग्रहालय 'वंतारा' हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू केला आहे. अलीकडेच त्यांनी याबद्दल सांगितले की त्यांच्यासोबत त्यांची होणारी पत्नी राधिका देखील प्राणीप्रेमी आहे. लग्नानंतर दोघेही एकत्र काम करणार आहेत. (anant ambani says family follows sanatan dharma no interest in politics)

अनंत यांनी इंडिया टुडेला सांगितले की, मला कोणत्याही प्रकारचे दडपण जाणवत नाही. अंबानी कुटूंबात जन्म घेणे हा माझा बहुमान आहे असे मला वाटते. माझ्या वडीलांनी मलाच नाही तर इतर अनेकांना चांगले काम करायला आणि भारतात उद्योग निर्माण करायला शिकवले.

ते पुढे म्हणाले, 'माझ्या वडिलांनी आणि माझ्या आजोबांनी रिलायन्सला खूप उंचीवर नेले. आणि मला वाटते की माझ्या वडिलांची संकल्पना पूर्ण करण्याची जबाबदारी माझी, माझ्या भावाची आणि माझ्या बहिणीची आहे.

अनंत यांनी सांगितले की अंबानी कुटुंब अतिशय धार्मिक आणि आध्यात्मिक आहे आणि सनातन धर्मावर विश्वास ठेवतात. अनंत म्हणाले की, 'माझा भाऊ शिवभक्त आहे. माझे वडील गणेशाची पूजा करतात. माझी आई नवरात्रीत नऊ दिवस उपवास करते.

माझी आजी देखील श्रीनाथजींची भक्त आहे. माझ्या कुटुंबातील प्रत्येकजण देवाचा भक्त आहे. आपल्याकडे जे काही आहे ते त्याने दिले आहे. आमचा विश्वास आहे की देव सर्वत्र आहे, तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये. माझे संपूर्ण कुटुंब सनातन धर्मावर विश्वास ठेवते.

अनंत अंबानींना राजकारणात यायचे आहे का?

अनंत यांना जेव्हा विचारण्यात आले की, त्यांना राजकारणात यायचे आहे का? तर त्यांनी उत्तर दिले की, 'मला राजकारणात रस नाही.'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Deepika Padukon : बायकोला सांभाळत रणवीरचं सहकुटूंब मतदान; दीपिकाच्या बेबी बंपने वेधलं लक्ष

धक्कादायक! नालासोपारा मतदारसंघातील तब्बल 'इतके' लाख मतदार गायब; निकालावर होणार थेट परिणाम

Magical Blanket : सत्यात अवतरलं क्षणात गायब करणारं हॅरी पॉटरचे जादुई ब्लॅंकेट, हे गॅजेट आहे कमाल

SCROLL FOR NEXT