Anil Ambani Tina Munim Wedding controversy esakal
मनोरंजन

Anant-Radhika Pre Wedding : अनिल अंबानींचं लग्नही सापडलं होतं वादाच्या भोवऱ्यात! काय होतं कारण?

अनिल अंबानी आणि टीना मुनिम यांची लवस्टोरी तेव्हा चर्चेत होती. गोष्ट लग्नापर्यत गेली अन् अंबानी परिवारानं त्याला विरोध केला.

युगंधर ताजणे

Anant ambani Radhika Merchant Pre Wedding : अंबानी परिवाराची वेगळी ओळख सांगण्याची काही गरज नाही. देशातील सर्वाधिक श्रीमंत कुटूंब म्हणून या परिवाराकडे नेहमीच पाहिले गेले. त्यातील अनेक गोष्टी हा (Ambani Family) नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय असतात. सध्या प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे चिरंजीव अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंगची चर्चा होत आहे.

जगभरातील विविध देशांतील मान्यवर या अनंत अंबानींच्या प्री वेडिंगला उपस्थित राहणार आहेत. अनंत अन् राधिकाच्या प्री वेडिंगसाठी खास (Anil Ambani - Tina Ambani Wedding) वेगळी थीमही ठेवण्यात आली आहे. त्यामध्ये देशातील विविध सेलिब्रेटी सहभागी होणार आहेत. खरं तर यापूर्वी देखील अंबानी परिवारातील ग्रँड वेडिंग हे चर्चेत आले आहेत. यापैकी एक म्हणजे अनंत अंबानीचे काका अनिल अंबानी आणि अभिनेत्री टीना मुनीम यांचे लग्न.

अनिल अंबानींचे लग्न हे त्यावेळी चर्चेत आले होते. अनिल आणि टीना (Latest Entertainment News) मुनीम यांचा प्रेमविवाह होता. त्यांच्या प्रेमविवाहाची स्टोरी आणि घरच्यांना जेव्हा ती गोष्ट कळली तेव्हा त्यावरुन झालेला वाद हा नेटकऱ्यांच्या कुतूहलाचा आणि चर्चेचा विषय राहिला आहे. अनिल अंबानींना टीनाला घरात सून म्हणून आणण्याचा प्रवास काही सोपा नव्हता. त्यासाठी त्यांना घरच्यांची खूप मनधरणी करावी लागली होती.

टीना मुनीम आणि अनिल अंबानी दोन्ही गुजराती कुटूंबातील. मात्र टीना मुनीम जरा जास्त मॉडर्न विचारधारेची होती असे सांगितले जाते. त्यांची ओळख एका लग्नात झाली होती. त्यानंतर त्यांची भेट फिलाडेल्फियामध्ये झाली होती. एका तिसऱ्याच व्यक्तीनं त्यांची ओळख करुन दिली होती. मात्र त्यावेळी टीनानं अनिल अंबानींकडे जास्त लक्ष दिले नव्हते. तिनं खरं तर तेव्हा अनिलच प्रपोझल नाकारलं होतं. मात्र काही काळानं पुन्हा त्यांच्यात भेटीगाठी होऊ लागल्या. या सगळ्यात गोष्ट लग्नापर्यत जाऊन पोहचत नव्हती.

अनिल आणि टीना अंबानीच्या लग्नाची चर्चा जेव्हा अंबानी कुटूंबियांच्या कानावर गेली तेव्हा त्यांनी हा प्रस्ताव नाकारला होता. आपल्याला फिल्म इंडस्ट्रीमधील सून नको अशी त्यांची भूमिका होती. अनिलनं ही गोष्ट मनावर घेतली आणि दोन्ही परिवारांची समजून काढण्यात त्यांना अपयश आले होते. टीनालाही ती गोष्ट खटकली होती. यानंतर त्यांची भेट लॉस एंजेलिसमध्ये झाली होती. या सगळ्यात पुन्हा त्यांच्यात वाढता संवाद यामुळे ते एकमेकांकडे आकर्षित झाले. असंही म्हटलं जातं की, अनिल अंबानींचे भाऊ मुकेश अंबानी यांनी पुढाकार घेत अनिलचं लग्न टीनाशी लावून दिलं.

दरम्यान अंबानी कुटूंबियांनी अखेर हो नाही करत त्यांच्या लग्नाला होकार दिला. आम्हाला सून म्हणून टीना पसंत आहे असे त्यांनी म्हटले आणि अनिल अंबानींच्या लग्नाचा मार्ग मोकळा झाला. मुंबईतील एका मोठ्या फुटबॉल मैदानात १९९१ मध्ये त्यांचं लग्न मोठ्या उत्साहात पार पडलं होतं. लग्नानंतर टीनानं फिल्मी करिअरला अलविदा केलं होतं. तिला अनमोल आणि अंशुल नावाची दोन मुलं आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis : 'भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी कोणालाही सोडणार नाही'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कडक इशारा, रूपाली चाकणकरांबाबत काय म्हणाले?

5 वर्षांनी स्वामींच्या भूमिकेला दिला निरोप! अक्षयची 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेतून एक्झिट, 'हे' ज्येष्ठ अभिनेते साकारणार भूमिका

Latest Marathi News Live Update : सातारा जिल्हा परिषद निवडणूक मुद्द्यावर मंत्री शंभुराज देसाई आक्रमक

Pregnant Woman Rescue: माणुसकी अजूनही जिवंत; जीवन संपवण्यासाठी डोंगरावर चढलेल्या गर्भवतीचा वाचविला जीव, खाण ८० फूट खाेल, युवकांची काैतुकास्पद कामगिरी!

Stock Market Today: ट्रम्पच्या धमकीनंतर बाजारात धुमाकूळ! 1 मिनिटातच सेन्सेक्स 1500 अंकांनी कोसळला; कोणते शेअर्स तोट्यात?

SCROLL FOR NEXT