Lata Mangeshkar news esakal
मनोरंजन

Anant -Radhika Pre Wedding : 'दोन तीन नव्हे पाचपट पैसे दिले तरी लग्नात गाणं म्हणणार नाही'! लता दीदींची होती ठाम भूमिका!

अनंत-राधिका च्या प्री वेडिंगमध्ये (Anant -Radhika Pre Wedding ) परफॉर्मन्स केलेल्या बॉलीवूड सेलिब्रेटींचे कौतुक होत असून दुसरीकडे काही जणांनी त्यांच्यावर प्रश्नही उपस्थित केले आहे.

युगंधर ताजणे

Anant -Radhika Pre Wedding : गुजरातमधील जामनगरमध्ये सध्या अंबानी परिवारातील एक शाही विवाह सोहळा पार पडला आहे. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यावरुन वेगवेगळ्या चर्चाही समोर येत आहे. त्या प्री वेडिंगला देश -विदेशातील अनेक मान्यवर उपस्थित होते. बॉलीवूडमधील कित्येक सेलिब्रेटींनी यावेळी परफॉर्मन्स देत चाहत्यांना सरप्राईज दिलं आहे.

अनंत अन् राधिकाच्या प्री वेडिंगला प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल, रिहाना, दिलजित दोसांज, अरिजित सिंह यांचे सादरीकऱण झाल्याचे दिसून आले आहे. या शिवाय बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी देखील यावेळी मोठ्या उत्साहानं या लग्नात परफॉर्मन्स देत मान्यवरांची पसंती मिळवली आहे.

मुकेश अन् नीता अंबानी यांचे कनिष्ठ पुत्र अनंत अंबानी यांचा प्री वेडिंग सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला. यावेळी त्याच्या व्हायरल झालेल्या फोटोंनी हा सोहळा किती भव्य दिव्य होता हे दाखवून दिलं आहे. अशातच जगातील प्रसिद्ध गायिका रिहाना पासून बॉलीवूडच्या दिलजित दोसांजसह अनेक सेलिब्रेटींनी यावेळी सादरीकरण केले. रिहानाचा हा भारतातील पहिलाच परफॉर्मन्स असल्याचे सांगितले जाते.

अशातच चर्चा अशी रंगली आहे ती म्हणजे सेलिब्रेटींच्या लग्न समारंभातील परफॉर्मन्सची. बऱ्याच वर्षांपूर्वी लग्नामध्ये गाणं गाण्यासाठी साक्षात महान गायिका लता दीदींना देखील विचारणा झाली होती. त्यावेळी त्यांनी जे उत्तर दिलं होतं ते आजच्या परिस्थितीला लागु पडतं. दीदींनी आपली ठाम भूमिका आणि निर्धार दाखवून दिला होता. सध्याच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवरुन दीदींची ती आठवण पुन्हा एकदा सांगितली जात आहे. त्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे.

दींदींनी स्पष्ट शब्दांत नकार कळवला होता...

लता दींदींना त्या लग्नामध्ये गाणं गाण्यासाठी विचारणा करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी स्पष्ट शब्दांत आपला नकार कळवला होता. लता मंगेशकर यांची छोटी बहिण प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी डान्स इंडिया डान्स ५ मध्ये दीदींचा तो किस्सा सांगितला होता. एनबीटीनं याबाबत वृत्त दिलं आहे.

आशाजी म्हणाल्या, दीदींना त्या एका लग्नामध्ये गाणं गाण्यासाठी त्यावेळी तब्बल एक मिलियन डॉलर देऊ करण्यात आले होते. तुम्ही फक्त दोन तास या, आणि लग्नात सहभागी व्हा. तुम्ही मला पाच मिलियन डॉलर जरी दिले तरी मी येणार नाही किंवा त्या कार्यक्रमात सहभागी होणार नाही. अशा शब्दांत दीदींनी त्याचा करारी बाणा दाखवून दिला होता.

आम्ही लग्नात गात नाही...

आशा भोसले यांनी दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळ्यात देखील अशीच एक आठवण सांगितली होती. त्या म्हणाल्या, आम्हाला कोणत्या तरी एका लग्नामध्ये बोलवण्यात आलं होतं. त्याच्याकडे मिलियन डॉलर पौंडचे तिकीट होते. त्या आयोजकांना असे वाटत होते की, मी आणि दीदीनं त्यांच्या लग्नात गाणं म्हणावं, त्यावर मी त्यांना स्पष्ट शब्दांत सांगितलं की, आम्ही लग्नात गाणं म्हणत नाही.तुम्ही दहा कोटी डॉलर दिले तरी गाणं म्हणणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejashwi Yadav FIR : मोठी बातमी! तेजस्वी यादव यांच्याविरोधात गडचिरोलीत गुन्हा दाखल

TikTok India News: भारतात पुन्हा 'टिकटॉक' सुरू होणार? ; वेबसाइट सुरू झाल्याचे समोर आल्याने चर्चांना उधाण!

Ajit Pawar: 'चाकरमानी’ नव्हे; ‘कोकणवासीय’ म्हणायचे! अजित पवारांची जागवला स्वाभिमान; शासन लवकरच परिपत्रक काढणार

Manoj Jarange Patil: मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ उपसमितीचं पुनर्गठन; राधाकृष्ण विखेंकडे अध्यक्षपद

Georai News : पाझर तलावात उतरल्याने बुडून शेतमजूराचा मृत्यू; दिवसभर शोध घेऊनही मृतदेह मिळाला नाही

SCROLL FOR NEXT