Maria Goretti Latest news  esakal
मनोरंजन

Anant Radhika Pre Wedding : अंबानींच्या प्री वेडिंगमधील 'हत्ती' पाहुन अर्शद वारसीची पत्नी संतापली, ट्रॅम्पच्या मुलीचा फोटो शेयर करत घेतली शाळा!

अनंत राधिकाच्या प्री वेडिंगमधील (Anant Radhika Pre Wedding) तो फोटो पाहिला अन् अर्शद वारसीच्या पत्नीचा मारियाचा संताप झाल्याचे दिसून आले आहे.

युगंधर ताजणे

Anant Radhika pre wedding : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंगचा सोहळा गुजरातमधील जामनगरमध्ये पार पडला. सध्या त्या सोहळ्यातील फोटो व्हायरल होत असून त्यावरुन वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. अशाच एका फोटोवर प्रसिद्ध अभिनेता अर्शद वारसीची पत्नी मारिया गोरेट्टी भडकल्याचे दिसून आले आहे.

मारियानं सोशल मीडियावर एक फोटो शेयर करुन तिचा संताप व्यक्त केला आहे. त्या फोटोमध्ये एक हत्ती आणि डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका दिसत आहे. यावर मारियानं शेयर केलेली पोस्ट नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियेचा विषय असल्याचे दिसून आले आहे. गेल्या काही दिवसांपासून अनंत अन् राधिकाच्या प्री वेडिंगनं साऱ्या जगभरातील नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतल्याचे दिसून आले.

anant radhika pre wedding latest news

या सोहळ्याला मायक्रोसॉफ्टच्या बिल गेट्स पासून भारतीय उद्योगविश्वातील मोठे उद्योगपती गौतम अदानी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यात बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींचाही समावेश होता. तीन दिवस सुरु असलेल्या या प्री वेडिंगविषयीच्या वेगवेगळ्या बातम्या समोर आल्या आहेत. त्यावर सेलिब्रेटींनी दिलेल्या प्रतिक्रिया त्या सोहळ्याविषयी खूप काही सांगून जाणाऱ्या आहेत.

अनंत आणि राधिकाच्या प्री वेडिंगमध्ये हत्तींना देखील सहभागी करुन घेतले होते. त्या हत्तींसोबत इवांकाचा फोटो पाहुन अर्शद वारसीची पत्नी मारिया संतापली आहे.

लग्नात प्राणी हवेच कशाला?

मारिया गोरेट्टीनं अंबानी यांच्या प्री वेडिंगमधील पार्टीचा एक फोटो शेयर केला आहे. त्यात त्यांनी इवांका ट्रॅम्पचा फोटो पोस्ट केला आहे. त्यात ती म्हणते, अंबानी यांच्या प्री वेडिंगमधील ते फोटो पाहिल आणि धक्काच बसला. मला वाटत नाही असं कुणी करु शकेल. प्राण्यांना कशासाठी त्या सोहळ्यात आणलं गेलं. एवढ्या गजबजाटात त्या हत्तीनं काय करायचं, त्याला त्या आवाजाचा त्रास होत नसेल का, याचा विचार करायला नको का?

मुळातच ज्या प्राण्यांच्या संरक्षणासाठी, सुरक्षेसाठी तुम्ही केंद्र उभारली आहेत त्यातील प्राण्यांच्या जीवाशी असा खेळ का, ते दृष्य पाहून मला खूप वाईट वाटलं. प्रॉप म्हणून त्या हत्तीला तिथं उभं करण्यात आलं आहे का, असे वाटू लागले आहे. अशा शब्दांत अर्शद वारसीच्या पत्नीनं तिची नाराजी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET फेरपरीक्षेत बोगस विद्यार्थ्यांचं रॅकेट, २४ जणांना अटक; बायोमेट्रिक कंपनीचे १४ जण ताब्यात

Mumbai: ‘बेस्ट’ची चाके रुतली; ‘लालपरी’ही रुतणार? एसटी आर्थिक संकटात, कर्मचारी काँग्रेसचा दावा

Latest Marathi News Live Update : नागपुरात भाजपचे उमेदवार राजीव पोतदार विजयी; काॅंग्रेसचे उमेदवार अतुल लोंढेंचा पराभव

Tawde Hotel Encroachment : कोल्हापुरात महापालिकेचा मोठा दणका! तावडे हॉटेल परिसरातील अनधिकृत बांधकामांवर आज चालणार जेसीबी; कडक आदेश जारी

Uddhav Thackrey: ‘शिवसेनेचे नेतृत्व उपऱ्यांनी ठरवू नये’उद्धव ठाकरेंचा अमित शहांना टोला, मतदारांची मागितली माफी

SCROLL FOR NEXT