Anant Radhika Pre Wedding latest news esakal
मनोरंजन

Anant Radhika Pre Wedding : 'डायमंड बॅग पासून अलिशान कारपर्यत...' अनंत-राधिकाला कुणी काय काय दिले, सगळ्यात महागडं 'गिफ्ट' कुणाचं?

बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी अनंत अन् राधिकाला महागडे (Anant Radhika Pre Wedding ) गिफ्टस दिल्याच्या चर्चा आहेत.

युगंधर ताजणे

Anant Radhika Pre Wedding Bollywood celebrity : केवळ भारतच नाही तर जगभरातील दिग्गज सेलिब्रेटींनी गुजरातमधील जामनगरमध्ये अनंत राधिकाच्या प्री वेडिंगला हजेरी लावली होती. त्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे. आता या प्री वेडिंगला आलेल्या सेलिब्रेटींनी नव्या वधू वराला कोणते गिफ्टस दिले याची चर्चा सुरु झाली आहे.

रणबीर अन् आलियाचीही चर्चा....

अनंत राधिकाच्या प्री वेडिंगला रणबीर आणि आलिया देखील उपस्थित होते. त्याची लेक राहा देखील लग्नात पाहुण्या मंडळींचे लक्ष वेधून घेताना दिसत होती. यावेळी रणबीर आलियानं अनंत -राधिकाला महागडे गिफ्ट दिल्याच्या बातम्यांना उधाण आले आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, आलियानं राधिकाला गुची ब्रँडचे डायमंड पर्स भेट म्हणून दिले आहे. तर रणबीरनं अनंतला जॉर्डन ब्रँडचे महागडे शूज गिफ्ट दिले आहेत.

बॉलीवूडचा भाईजान सलमान खान हा देखील त्याच्या गिफ्ट देण्याबाबत फेमस आहे. त्यानं दोघांना फिलिप ब्रँडचे महागडे घड्याळ आणि राधिकाला इयर रिंग गिफ्ट म्हणून दिल्याचे सांगण्यात येत आहे. दैनिक जागरणनं याबाबत वृत्त दिले आहे.

बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रेटींनी वेगवेगळे गिफ्ट देत आपली वेगळी ओळख दाखवून दिली आहे. त्यात किंग खाननं बाजी मारली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार किंग खाननं अनंत अंबानीला सगळ्यात जास्त महागडे गिफ्टस दिले आहेत. त्यानं या कपलला लक्झरी स्पोर्टस कार भेट दिली असून त्याची किंमत ५ कोटी रुपये एवढी आहे.

कियारा अन् अनंत अंबानीची बहिण ईशा या लहानपणीच्या मैत्रीणी आहे. कियारा अन् सिद्धार्थनं देखील अनंत राधिकाच्या प्री वेडिंगला हजेरी लावली होती. त्यांनी त्यांना गिफ्ट म्हणून गोल्ड आणि डायमंडचे गणपती-लक्ष्मी भेट म्हणून दिले आहेत. दीपिका अन् रणवीर सिंग हे देखील गिफ्ट देण्यात मागे राहिलेले नाही. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी अनंत अन् राधिकाला एक लक्झरी ब्रँडचे डायमंड असलेले घड्याळ गिफ्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT