Anant-Radhika Dance Viral esakal
मनोरंजन

Anant-Radhika Pre Wedding : 'आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जुबान पर!' अनंत अन् राधिकाचा भन्नाट डान्स

अनंत-राधिकाच्या प्री वेडिंगनं आता सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या उत्साहाला उधाण आलं आहे.

युगंधर ताजणे

Anant Radhika Pre Wedding Dance video : अनंत अन् राधिकाच्या प्री वेडिंगची साऱ्या देशभर चर्चा आहे. त्याला जगभरातून वेगवेगळ्या क्षेत्रांमधून पाहुणे आले आहे. जगप्रसिद्ध अशा मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक अध्यक्ष बिल गेट्स पासून मेटा फेसबूकच्या मार्क झुकरपर्यत अनेक मान्यवर उपस्थित होते. गुजरातमधील जामनगर येथे हा सोहळा पार पडत आहे.

गेल्या दोन दिवसांपासून अनंत अन् राधिकाच्या प्री वेडिंगची चर्चा होताना दिसत आहे. त्यासाठी चार महिन्यांपासून प्री प्लॅनिंगही सुरु होते. अशातच अखेर हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडताना दिसतो आहे. त्याला बॉलीवूडमधील तारे तारकांनी हजेरी लावली आहे. बिझनेस, राजकारण, समाजकारण, साहित्य अन् कला क्षेत्रातील मान्यवर यांनी सोहळ्याला उपस्थिती दर्शवली आहे.

आता सोशल मीडियावर अनंत अंबानी आणि राधिकाच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जुबान पर...या गाण्यावर त्यांनी केलेला डान्स हा अनेकांच्या कौतुकाचा विषय आहे. अनंतनं यापूर्वी त्याच्या मनोगतातून आई आणि वडील यांच्या विषयीच्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्यावेळी मुकेश अंबानी भावूक झाल्याचे दिसून आले होते. तो व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय होता.

गुजरात मधील जामनगरमध्ये पार पडणाऱ्या या सोहळ्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यातील प्रत्येक इव्हेंटची चर्चा झाली असून त्यासाठी खास ड्रेस कोडही ठेवण्यात आले होते. जंगल थीममध्ये वेगवेगळे कार्यक्रम, त्यासाठी वेगळी ड्रेपरी हे या सोहळ्याचे वेगळे वैशिष्ट्य अन् वेगळेपण म्हणावे लागेल. या शिवाय अन्य कार्यक्रमांमध्ये देखील उपस्थित पाहुण्यांना ठराविक ड्रेपरी परिधान करण्यास सांगण्यात आले होते.

अनंत राधिकाच्या प्री वेडिंगचे मुख्य आकर्षण ठरले आहे ते रिहानाचा परफॉर्मन्स. असं म्हटलं जात आहे की, कोट्यवधी रुपये खर्च करुन तिला परफॉर्मन्ससाठी बोलावण्यात आले. ज्याची चर्चा होत आहे. सोशल मीडियावर रिहानाच्या गाण्यांचे व्हिडिओ व्हायरल झाले आहे.

मुकेश अन् नीता अंबानी यांनी देखील राज कपूर यांच्या चित्रपटातील एका गाण्यावर केलेला डान्स हा त्या सोहळ्यातील खास चर्चेचा विषय होता. तो ही सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Free Trade Deal: मोठी आर्थिक घडामोड! व्हिस्की, लक्झरी कारसह अनेक वस्तू होणार; ग्राहकांना दिलासा मिळणार, पण कधीपासून?

IND vs ENG Women Test : भारताविरुद्धच्या ऐतिहासिक कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर; ५ नव्या चेहऱ्यांना संधी

Vegetable Rate Hike : पावसाचे आगमन लांबले; भाजीपाला महागला! आवक ४० टक्क्यांनी घटली; मेथी, भेंडी, पालक, वांगीही तेजीत

Bullet Train: भारतच पुढची बुलेट ट्रेन उभारणार! मुंबईहून पुण्यात अवघ्या ४८ मिनिटांत पोहोचणार; कामाला सुरुवात कधी होणार?

'तो फोनवर घाणेरडं बोलत होता' अमृता खानविलकरने सांगितला धक्कादायक अनुभव, म्हणाली...'निनावी नंबरवरून कॉल आला अन्...'

SCROLL FOR NEXT