Rajnikanth Latest News esakal
मनोरंजन

Rajnikanth On Anant Radhika Pre Wedding : 'अंबानींच्या लेकाचं प्री वेडिंग म्हणजे साक्षात...' सुपरस्टार रजनीकांत काय म्हणाले?

सुपरस्टार रजनीकांत (Rajnikanth On Anant Radhika Pre Wedding) यांनी मुकेश अंबानी यांच्या लेकाच्या प्री वेडिंगवर रजनीकांत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

युगंधर ताजणे

Anant Radhika Pre Wedding Jamnagar Superstar Rajinikath : अनंत अंबानी अन् राधिका मर्चंटच्या प्री वेडिंगला साऱ्या जगभरातून वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर हजर होते. सोशल मीडियावर गेल्या चार ते पाच दिवसांपासून प्री वेडिंगच्या बातम्यांनी चाहत्यांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले आहे. या सगळ्यात दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी अंबानी यांच्या लेकाच्या प्री वेडिंगवर दिलेली प्रतिक्रिया खूप काही सांगून जाणारी आहे.

बॉलीवूड, टॉलीवूडमधील विविध सेलिब्रेटींनी या सोहळ्याला उपस्थिती लावली होती. यामध्ये बिग बी अमिताभ बच्चन ते सिद्धार्थ मल्होत्रा आणि जया बच्चन ते जान्हवी कपूर या सेलिब्रेटींचा समावेश होता. यावेळी बॉलीवूडच्या सेलिब्रेटींनी त्या प्री वेडिंगमध्ये उत्साहात सहभागी होत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यात सलमान, शाहरुख आणि सलमान खानच्या नाटू नाटू गाण्यावर केलेल्या डान्सचा उल्लेख करता येईल.

दस्तुरखुद्द मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी देखील आपल्या सादरीकरणानं नेटकऱ्यांना जिंकून घेतले होते. त्याचे सोशल मीडियावर कौतुक केले होते. या सगळ्यात आता सुपरस्टार रजनीकांत यांनी अंबानी यांच्या लेकाच्या अनंतच्या प्री वेडिंगची प्रशंसा केली आहे. त्यांनी त्यावर खास प्रतिक्रियाही दिली आहे.

गुजरातमधील जामनगर येथे रजनीकांत हे त्यांची पत्नी लता, मुलगी ऐश्वर्या हिच्या समवेत सहभागी झाले होते. यावेळी रजनीकांत यांचे त्या प्री वेडिंगमधील फोटोंना चाहत्यांची पसंती मिळाल्याचे दिसून आले आहे. रजनीकांत यांनी आपल्या प्रतिक्रियेमध्ये म्हटले आहे की, नीता आणि मुकेश अंबानी यांनी प्री वेडिंगचा जो सोहळा आयोजित केला होता तो खूपच मंत्रमुग्ध करणारा होता. हा सोहळा म्हणजे जसं काही साक्षात कैलासाला त्यांनी पृथ्वीवर बोलावलं होतं. मी राधिका आणि अनंत या दोघांनाही त्यांच्या वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

राधिका अन् अनंतच्या प्री वेडिंगमध्ये रजनीकांत यांच्या लूक्सची चर्चा होत आहे.त्यांनी व्हाईट कलरचा कुर्ता परिधान केला होता. याशिवाय बिग बी अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची एंट्री देखील ग्रँड होती. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओनं चाहत्यांच्या प्रतिक्रियांना उधाण आले होते.

गेल्या तीन दिवसांपासून सुरु असणाऱ्या या सोहळ्यातील फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. त्यात मनोरंजन क्षेत्रातील सेलिब्रेटींनी केलेली धमाल आणि त्यांचा उस्फुर्त सहभाग यावरुन चर्चा सुरु आहेत. दुसरीकडे शाहरुखनं साऊथचा प्रसिद्ध अभिनेता रामचरण याचा अपमान केल्याच्या बातम्यांना उधाण आलं आहे. शाहरुखनं त्याला स्टेजवर बोलावताना त्याचा उल्लेख इडली वाला असं म्हणून केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: राज्यात पुढील ५ दिवस हवामान बिघडणार! पुणे, नागपूरसह अनेक जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी; विभागाकडून सतर्कतेचं आवाहन

Pakistan Blast: पाकिस्तान पुन्हा हादरलं! शांतता रॅलीत भीषण स्फोट; १४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी, नेमकं काय घडलं?

प्रश्न कमी, परीक्षा आता एकाच शिफ्टमध्ये; NEET PG 2026 चे नवे नियम जाहीर, 'या' 5 गोष्टी जाणून घ्या...

FDA थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करते? तुकाराम मुंढेंनी कारवाईमागचं नेमकं कारणच सांगितलं! जाणून घ्या कायदा...

Gangaapur Accident: गंगापूर फाट्याजवळ उभ्या ट्रकला आयशरची जोरदार धडक; २५ वर्षीय चालक गणी शेख जागीच ठार

SCROLL FOR NEXT