Aamir Shah Rukh Salman News  esakal
मनोरंजन

Anant Radhika Pre Wedding : अनंत राधिकाच्या प्री वेडिंगमधील डान्ससाठी शाहरुख, आमिर अन् सलमाननं किती पैसे घेतले?

अनंत अन् राधिकाच्या प्री वेडिंगमध्ये सलमान, शाहरुख आणि आमिरचं डान्स करणं हे वेगवेगळ्या प्रकारे चर्चेत आलं आहे.

युगंधर ताजणे

Anant Radhika Pre Wedding : बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेते शाहरुख, सलमान आणि आमिर हे जेव्हा अनंत राधिकाच्या प्री वेडिंगमध्ये डान्स करताना दिसले तेव्हा जेवढा त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला तेवढीच टीका झाल्याचे दिसून आले. या परफॉर्मन्ससाठी त्यांनी किती फी घेतली असेल याच्याविषयी चर्चांना उधाण होते. त्याबाबत एक बातमी समोर आली आहे.

शाहरुख, सलमान आणि आमिर हे बॉलीवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेते आहेत. त्यांनी त्यांच्या नावाची वेगळी क्रेझ तयार केली आहे. त्यांच्याशिवाय बॉलीवूडमधील अनेक प्रोजेक्टला वजन येत नाही असेही बोलले जाते. त्यामुळे या तीनही अभिनेत्यांचा एखाद्या प्रोजेक्टसाठीचा शब्द हा अंतिम मानला जातो. अशातच त्यांच्या अंबानी यांच्या प्री वेडिंगमधील डान्स हा चर्चेत आला आहे.

किंग खान, भाईजान आणि मिस्टर परफेक्शनिस्ट हे त्यांच्या चित्रपटांसाठी जे मानधन घेतात त्याची आकडेवारी प्रचंड मोठी असते. त्यामुळे ते जेव्हा प्री वेडिंगमध्ये थिरकताना दिसले तेव्हा त्यांनी त्यासाठी मोठी फी वसूल केली असल्याच्या बातम्यांना उधाण आले होते. त्या पार्टीवरुन टाईम्स नाऊनं देखील एक रिपोर्ट दिला आहे.

काय आहे सत्य?

शाहरुख खान, आमिर खान आणि सलमान खान यांनी अनंत अंबानीच्या प्री वेडिंग दिलेला परफॉर्मन्स हा चर्चेत आला होता.यावेळी त्यांनी आरआरआर चित्रपटातील नाटू नाटू गाण्यावर डान्स केला होता. त्या डान्सनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. या सगळ्यात या तीनही खान कलाकारांनी प्री वेडिंगसाठी किती मानधन घेतल्याची चर्चा होती. याबाबत दैनिक जागरणं एक वृत्त दिलं आहे.

त्या वृत्तानुसार, तीनही खान कलाकारांनी प्री वेडिंगसाठी एकही रुपया घेतला नसल्याची माहितीआहे. त्या पार्टीमध्ये त्यांनी केलेला डान्स हा उस्फुर्तपणे केला होता. त्यासाठी त्यांनी कोणतीही पूर्वतयारी केलेली नव्हती. त्यांनी कोणतंही मानधन घेतलं नसल्याचे म्हटले गेले आहे. मात्र रिहानानं तिच्या परफॉर्मन्ससाठी पन्नास कोटींपेक्षा जास्त पैसे घेतल्याची चर्चा आहे.

अंबानींच्या पार्टीमध्ये बॉलीवूड सेलिब्रेटींची जत्रा...

अनंत अन् राधिका यांच्या प्री वेडिंगला बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटी हजर होते. यामध्ये बिग बी अमिताभ बच्चन, जया बच्चन, ऐश्वर्या रॉय, अभिषेक बच्चन, सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा अडवाणी, सैफ अली खान, करिना कपूर, शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान, सारा अली खान, इब्राहीम अली खान,अनन्या पांडे, आदित्य रॉय कपूर तसेच दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी देखील या सोहळ्याला उपस्थिती लावली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT