अभिनेता चंकी पांडेची मुलगी आणि अभिनेत्री अनन्या पांडे ही अल्पावधीतच बॉलिवूड इंडस्ट्रीत लोकप्रिय झाली. अनन्याचे केवळ तीनच चित्रपट प्रदर्शित झाले असले तरी सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. बॉलिवूडमध्ये चर्चेत राहणाऱ्या स्टारकिड्सपैकी ती एक आहे. अलीकडेच अनन्याची चुलत बहीण अलाना पांडे मुंबईला आली होती. अलाना सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असून ती अमेरिकेत राहते. पण अनन्या आणि तिची बहीण रायसाला भेटण्यासाठी ती मुंबईला आली होती. यावेळी असा काही किस्सा घडला की, अनन्याच्या बहिणीकडूनच तिचा मोबाईल नंबर इंटरनेटवर लीक करण्यात आला होता. खुद्द अनन्याने याबाबत नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं. अलाना तिच्या मुंबई ट्रिपबद्दल व्हिडीओ करत असताना रायसाने युट्यूबवर अनन्याचा मोबाईल नंबर लीक केला.
बहिणीने मोबाईल नंबर लीक केल्यामुळे नंतर अनन्याला बराच त्रास सहन करावा लागला होता. अनन्याला सतत फोन येत होते. रायसाला चित्रपट निर्माती आणि दिग्दर्शिका व्हायचं आहे. यासंदर्भातील व्हिडीओ ती सोशल मीडियावर अपलोड करत होती. त्यावेळी चुकून तिच्याकडून अनन्याचा नंबर शेअर केला गेला. थोड्या वेळानंतर ही चूक लक्षात येताच तिने तो व्हिडीओ डिलिट केला.
अनन्याने नुकताच बहीण रायसाचा वाढदिवस थाटामाटात साजरा केला. या दोघी बहिणी मैत्रिणींसारख्याच एकमेकींशी वागतात. अनन्याच्या चित्रपटांविषयी बोलायचे झाल्यास ती आगामी 'लायगर' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडासोबत ती रोमान्स करताना दिसणार आहे. हा चित्रपट ९ सप्टेंबर २०२१ रोजी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय ती शकुन बत्रा दिग्दर्शित एका चित्रपटातही झळकणार आहे. यामध्ये तिच्यासोबत सिद्धार्थ चतुर्वेदी आणि दीपिका पदुकोण यांच्याही मुख्य भूमिका आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.