esakal | बराक ओबामांच्या पत्नीला विचारला सेक्स लाइफविषयी प्रश्न; अँकरला मिळालं सडेतोड उत्तर
sakal

बोलून बातमी शोधा

jimmi kimmel and michalle obama

त्यांनी दिलेल्या उत्तराची सध्या जगभरात चर्चा होत आहे.

बराक ओबामांच्या पत्नीला विचारला सेक्स लाइफविषयी प्रश्न; अँकरला मिळालं सडेतोड उत्तर

sakal_logo
By
स्वाती वेमूल

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची पत्नी मिशेल ओबामा या कुशाग्र बुद्धिमत्ता आणि हजरजबाबीपणासाठी ओळखल्या जातात. अनेक विषयांवर त्या बेधडकपणे आणि तितकंच विचारपूर्वक मतं मांडत असतात. अत्यंत मोजून मापून बोलणाऱ्या मिशेल यांच्या अनेक मुलाखती या पाहण्यासारख्या असतात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांना एक असा प्रश्न विचारला गेला की त्यावर त्यांनी दिलेल्या उत्तराची सध्या जगभरात चर्चा होत आहे. अमेरिकेचा प्रसिद्ध सूत्रसंचालक, कॉमेडियन, लेखक जिम्मी किमेलच्या एका शोमध्ये त्यांनी हजेरी लावली होती. मिशेल या स्वत:चा शो वॅफेल्स प्लस मोचीचं प्रमोशन करण्यासाठी तिथे आल्या होत्या. याच वेळी जिम्मीने त्यांना बराक ओबामा यांच्या कार्यकाळातील एक प्रश्न विचारला. 

"काही वर्षांपूर्वी मी वॉशिंग्टन येथे तुमची मुलाखत घेतली होती. त्यावेळी आपण बऱ्याच गप्पा मारल्या होत्या. ती त्यावेळीसुद्धा तुम्हाला हा प्रश्न विचारला होता आणि तुमच्या पतीलाही मी हा प्रश्न विचारला होता. पण त्यांनी चेंडू तुमच्या कोर्टात ढकलला. आता पुन्हा तुम्हाला मी विचारतो, ज्यादिवशी बराक ओबामांच्या आदेशावर नेव्ही सीलने ओसामा बिन लादेनचा खात्मा केला. त्या रात्री तुम्ही आनंद साजरा करण्यासाठी लव्हमेकिंग (सेक्स) केलात का?"

जिम्मीच्या प्रश्नामागील हेतू उमगताच मिशेल यांनी त्याला उत्तर दिलं, "मी तुझ्या प्रेक्षकांना सांगू इच्छिते की, का कोणास ठाऊक पण तुला त्या ऐतिहासिक घटनेमधील केवळ याच विषयाबाबत कमालीची उत्सुकता आहे. इतर कुणालाही कधी असं विचारावंसं वाटलं नाही. आतापर्यंत मी जितक्या मुलाखती दिल्या, त्यात कधीच कोणी इतक्या खालच्या पातळीवर जाऊन मला प्रश्न विचारला नाही", असं त्या म्हणाल्या. इतकंच नाही तर पुढे हसत त्या जिमीला म्हणाल्या, "तू अजूनही तो छोटा मुलगा आहेस तो बेडरुममध्ये चादरीखाली फ्लॅशलाइट लावून अशा भ्रमात असशील की कोणीच मला पाहत नाहीये."

हेही वाचा : संग्राम समेळच्या दुसऱ्या लग्नानंतर पूर्वाश्रमीच्या पत्नीने पोस्ट केला बोल्ड फोटो

मिशेल ओबामा यांचं हे उत्तर ऐकून जिमीचंही तोंड बंद झालं. नंतर त्याने त्याचा प्रश्न फिरवत स्वयंपाकाविषयी ओबामा यांना विचारलं. घरात बेस्ट कुक कोण असं त्याने विचारलं. त्यावर त्यांनी बराक ओबामांपेक्षा कितीतरी पटीनं सरक कुक असल्याचं सांगितलं. 

loading image