Ananya Panday TROLLED For Sharing An Unfiltered Selfie; Netizens Recommend Her Toothpaste Brand sakal
मनोरंजन

Ananya Panday: अगं बाई दात तरी घासत जा की.. अनन्या पांडे पुन्हा ट्रोल..

अभिनेत्री अनन्या पांडे तिच्या पोस्टमुळे पुन्हा एकदा ट्रोल झाली आहे.

नीलेश अडसूळ

ananya panday: चंकी पांडेची मुलगी अनन्या हिने बॉलीवूडमध्ये आपल्या करिअरला सुरुवात करून काही काळ लोटला, पण तिला कोणीही गांभीर्याने घेत नाही अशी परिस्थिती आहे. तिच्या जाहिराती सध्या जोरदार आहेत पण चित्रपटाला मात्र मनासारखा प्रतिसाद मिळत नाही. अजुन‌ही अनन्या म्हणावी तशी लाईम लाइट मध्ये आलेली नाही. पण काही बाबतीत ट्रॉलर्स काही तिची पाठ सोडत नाहीत. नुकतीच एका फोटोमुळे अनन्या पांडे ट्रोल झाली आहे.

(Ananya Panday TROLLED For Sharing An Unfiltered Selfie; Netizens Recommend Her Toothpaste Brand)

अलीकडेच ती अनन्या विजय देवरकोंडासोबत 'लायगर' चित्रपटात दिसली होती. पण, तिचा इतर चित्रपटांप्रमाणे हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. सध्या अनन्याला तिच्या एका सेल्फीमुळे सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले जात आहे.

अनन्याने तिच्या इंस्टाग्रामवर तिचा एक अनफिल्टर सेल्फी शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती मोठी स्माईल करून चाहत्यांना सकारात्मक वाइब्स देताना दिसली. या फोटोमध्ये ती 'नो-मेकअप' लुक मध्ये दिसत होती.

फोटो शेअर केल्यानंतर तिला ट्रोल करण्यास सुरुवात झाली आहे. त्यापैकी एकाने लिहिले आहे की, "हे तर मेंदूशिवाय सौंदर्य," तर दुसऱ्याने लिहिले आहे, "अनन्या आधी दात तर घास बाई " दुसर्‍याने लिहिले, "तु चित्रपटांपेक्षा जाहीराती मध्ये काम कर", " या कलाकारांना काही काम नाही उठले की केला फोटो पोस्ट ", "अनन्या हाच तुझा स्ट्रगल वाटतं" अशा कमेंट तिच्या फोटोवर आल्या आहेत.

इतकेच नव्हेतर तीची तुलना कार्तिक आर्यन बरोबर केली "ही तर कार्तिक आर्यनसारखी दिसत आहे असेही म्हंटले आहे. पण तिच्या अस्सल चाहत्यांनी मात्र तिच्या फोटोचे कौतुकही केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HSC Hall Ticket 2026 : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेचे प्रवेशपत्र 'या' दिवसापासून मिळणार!

Pune: पुण्यातील शाळेत तंत्रज्ञान शिक्षणाला चालना मिळणार; प्राथमिक विद्यार्थ्यांना रोबोटिक्सचे धडे

Devendra Fadnavis Virar : "वसई-विरारमधील एकाही गरिबाचे घर तोडू देणार नाही"; देवेंद्र फडणवीसांचे मोठे आश्वासन!

Pune Election Bribery : पुण्यात संक्रांतीच्या नावाखाली मतांची खरेदी; प्रशासनाच्या डोळ्यावर पट्टी!

Devendra Fadnavis : "उद्धव ठाकरेंनी एक विकासकाम सांगावे, मी ३ हजार देईन"; फडणवीसांनी उडवली ठाकरेंची खिल्ली!

SCROLL FOR NEXT