ananya pande, chunky pande, ananya pande - chunky pande dance video SAKAL
मनोरंजन

Ananya Pande: सात समुंदर पार... गाण्यावर एकत्र थिरकले अनन्या आणि चंकी, Video तुफान व्हायरल

अचानक चंकी पांडे लाडक्या लेकीसोबत ठेका धरतात

Devendra Jadhav

Anannya Pande and Chunky Pande Dance Video Viral: अनन्या पांडे आणि चंकी पांडे हि बापलेकाची जोडी सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. अनन्या आणि चंकी हे त्यांच्या मस्तीखोर अंदाजामुळे कायमच प्रकाशझोतात असतात.

नुकतंच या बापलेकीचा एक खास व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. सध्या पांडे कुटुंबाच्या घरी अनन्याची चुलत बहीण अलाना पांडे लगीनघाई सुरु आहे. याच लग्नातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

(ananya pande and chunky pande dance video viral of the song saat samundar at alana pande wedding)

अनन्या लग्नात सात समुंदर पार मैं तेरे पीछे पीछे आ गयी गाण्यावर डान्स करत असते. आणि अचानक चंकी पांडे लाडक्या लेकीसोबत ठेका धरतात.

अनन्या सुद्धा बाबांसोबत डान्स स्टेप करत धमाकेदार परफॉर्मन्स करते. बाप - लेकीच्या डान्सला उपस्थित कुटुंबातले सदस्य दाद देतात. अनन्या सोबत चंकी पांडे सुद्धा मस्त डान्स स्टेप करत आहेत.

अनन्याने बहीण अलाना पांडेच्या मेहंदी सेरेमनीमध्ये बेबी पिंक स्कर्ट आणि एक स्ट्रॅप क्रॉप टॉप घातला होता. तिने या लुकला मिडल पार्टेड हेअरस्टाइल आणि न्यूड मेकअपसह पूरक केले. या लूकमध्ये ती खूपच गोंडस दिसत होती.

पण एका फोटोमुळे अनन्याला ट्रोल केलं गेलं. या फोटोमध्ये अनन्याच्या आजूबाजूला पाहुणे दिसत आहेत आणि ती एका कोपऱ्यात धूम्रपान करताना दिसत आहे.

सोहेल खानच्या घरी हा मेहंदी सोहळा पार पडला. या कार्यक्रमात सलमान खानची आई सलमा खान आणि हेलनही पोहोचल्या होत्या.

सलमानची बहीण अलविरा अग्निहोत्री आणि अतुल अग्निहोत्रीही या कार्यक्रमाला उपस्थित होते.अभिनेता बॉबी देओलही पत्नीसोबत पोहोचला. अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप देखील या फंक्शनचा एक भाग होती.

या सोहळ्यापूर्वी अलानाचे ब्राइडल लंच आयोजित करण्यात आले होते. या लंचची थीम व्हाइट कलर होती. अनन्या पांढऱ्या रंगाच्या वन पीसमध्ये दिसली. तिने आपला लूक साधा ठेवला होता. आजकाल अनन्या पांडेही तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आहे.

तिचे नाव अभिनेता आदित्य रॉय कपूरसोबत जोडले जात आहे. त्यांच्या अफेअरच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होत्या.

अलीकडेच, दोघांनीही लॅक्मे फॅशन वीकच्या ग्रँड फिनालेमध्ये मनीष मल्होत्रासाठी एकत्र रॅम्प वॉक केला होता. अनन्याने आदित्यसोबतचे अनेक फोटोही शेअर केले होते. मात्र, अनन्या किंवा आदित्य या दोघांनीही अशा अफवांवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT