Shah rukh Khan, Ananya Pandey Instagram
मनोरंजन

अनन्या पांड्येच्या डोक्यात गेलीय हवा,थेट शाहरुखशी घेतला पंगा

किंग खानच्या सिनेमांनी चुकीच्या गोष्टी शिकवल्याचं अनन्यानं म्हटलं आहे.

प्रणाली मोरे

'गहराइयां' सिनेमातील हॉट सीन आणि बोल्ड लूकमुळे सध्या अभिनेत्री अनन्या पांड्ये(Ananya Pandye) भलतीच चर्चेत आहे. हा सिनेमा प्रेम आणि त्यातील फसवणूक या विषयावर भाष्य करतो. आता या सिनेमाच्या निमित्तानं दिलेल्या एका मुलाखतीत चक्क अनन्यानं तिची प्रेमाविषयीची कल्पना आणि समजुत यावरं भऱभरुन संवाद साधत अनेक खुलासे देखील केले आहेत. तिला प्रेमाविषयी प्रश्न विचारताच ती म्हणाली,''मी जसजशी मोठी होत गेले तसतशी माझ्या मनातील प्रेमाविषयीची भावना बदलत गेली''. एवढंच नाही,तर पुढे तिनं चक्क शाहरुखच्या सिनेमांना घेऊन मोठं वक्त्व्य केलं आहे. पण तिच्या या वक्तव्यामुळे तिची बेस्ट फ्रेंड सुहाना खान मात्र नाराज होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत.

ती आपल्या मुलाखतीत म्हणाली आहे,''किंग खान च्या रोमॅंटिक सिनेमांनी प्रेमाविषयी खूप चुकीची शिकवण आमच्या पिढीला दिली आहे''. यावेळी तिनं स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याविषयी,रोमॅंटिक रिलेशनशीपविषयी मनमोकळा संवाद साधला. ती पुढे म्हणाली,''मी जेव्हा मोठी होत होते तेव्हा मी शाहरुखचे सगळेच सिनेमे आवडीनं पहायचे. आणि माझ्या आयुष्यात देखील त्यांच्यासारखाच एक जोडीदार हवा अशी इच्छा मनात धरुन होते. जो माझ्यावर खूप प्रेम करेल,शाहरुख सारख्याच रोमॅंटिक नजरेनं माझ्याकडे पाहिल. पण जसजशी मी मोठी होऊ लागले तसं मला कळू लागलं की प्रेम फक्त मैत्री नाही,किंवा संवाद साधणं नाही,ते त्याहीपेक्षा खुप वेगळी भावना आहे''. तिनं आजच्या मॉर्डन युगातल्या प्रेमाविषयीच्या संकल्पनांवरही संवाद साधला. तर आजच्या जनरेशनमध्ये कसं सहज आपल्या जोडीदाराला सोडून,दुसऱ्याकडे आकर्षित होणं ही गोष्ट सहज दिसून येते,जे आजचं सत्य आहे यावरही तिनं आपलं स्पष्ट मत मांडलं आहे.

''आज आपल्याला नात्यात तडजोड करायची नाहीय. पण म्हणून ते चुकीचं आहे असंही आपण म्हणू शकत नाही. मला फक्त एवढंच वाटत जर तुम्ही कशासाठी तडजोड करू इच्छित नाही,जी गोष्ट तुम्हाला आनंद देत नाही तर पुढे जाणं उत्तम,तिथे तडजोड करत बसण्यापेक्षा''. 'गहराइयां' प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया त्यावर येत असल्या तरी अनन्याच्या कामाचं मात्र कौतूक होताना दिसतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT