Anaya Soni Latest News Anaya Soni Latest News
मनोरंजन

Anaya Soni : टीव्ही अभिनेत्री अनाया सोनीची प्रकृती चिंताजनक; किडनी निकामी

अनायाच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने उपचाराचा खर्च भागवणे कठीण जात आहे

सकाळ डिजिटल टीम

Anaya Soni Latest News टीव्ही अभिनेत्री अनाया सोनीची (Anaya Soni) प्रकृती चिंताजनक आहे. टीव्ही शो मेरे साईच्या शूटिंगदरम्यान अनाया सोनी अचानक बेशुद्ध पडली होती. यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोनीची प्रकृती अद्याप चांगली नाही आणि गुंतागुंत खूप वाढली आहे. अनायाच्‍या इंस्‍टा अकाऊंटवरून चाहत्यांना प्रकृतीचे अपडेट दिले जात आहे.

अनाया सोनीची (Anaya Soni) एक किडणी (Kidney) पूर्णपणे खराब झाली आहे. तिची खराब झालेली किडणी बदलावी लागेल. अनाया डायलिसिसवर आहे. तिच्या प्रकृतीवर इतका खर्च होत आहे जो कुटुंबाला सांभाळणे कठीण जात आहे, असे अनायाच्या वडिलांनी सांगितले.

अनायाच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने मुलीच्या उपचाराचा खर्च भागवणे कठीण जात आहे. अनायाने अलीकडेच प्रकृतीची माहिती देणारा इन्स्टाग्राम पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ती म्हणाली, ‘डॉक्टर सांगत आहेत की माझी किडणी निकामी झाली आहे. मला डायलिसिसवर जावे लागेल.’ सोशल मीडियावर युजर्सनी तिला आयुर्वेदिक उपचारांकडे वळण्याचा सल्ला दिला आहे.

अनायाने लिहिले, माझी क्रिएटिन लेव्हल १५.६७ वर आली आहे आणि हिमोग्लोबिन ६.७ वर आला आहे. माझी प्रकृती खूप गंभीर आहे. माझ्यासाठी प्रार्थना करा. माझे जीवन सोपे नाही आहे. परंतु, मी ते सोपे करण्याचा प्रयत्न करत होती. हेही लवकरच पार पडेल. मी लवकरच किडणी प्रत्यारोपण करणार आहे. मी डायलिसिसनंतर किडनीसाठी अर्ज करेन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Illegal Gender Test : नाव श्रद्धा पण काम अंधश्रद्धा, उमलणाऱ्या कळा खोडणारा डॉक्टर; एजंट ताब्यात, सोनोग्राफी मशीन, गोळ्या जप्त

Pandharpur Vitthal Online Puja Booking : सावळ्या विठ्ठलाची पूजा करायचीय? 'या' तारखेपासून सुरू होतेय ऑनलाईन नोंदणी; जाणून घ्या सविस्तर नियम!

Latest Marathi News Live Update : शरद पवार आज एक दिवसाच्या नागपूर दौऱ्यावर, काय आहे कारण?

'हा कसला फालतूचा अ‍ॅटिट्यूड' काजोल पापाराझींवर भडकल्याने नेटकरी संतापले, Viral Video

Maharashtra kerosene Supply: राज्य सरकारचा रॉकेल पुरवठ्याचा निर्णय; वितरण करणारी व्यवस्था नामशेष, रॉकेल येणार पण स्टोव्हच सापडेना!

SCROLL FOR NEXT