ayushman khurana on andhadhun  
मनोरंजन

'अंधाधुन' ने मला अभिनेता म्हणून प्रस्थापित केलं- आयुषमान खुराना

वृत्तसंस्था

मुंबई : आयुषमान खुरानाने बॉलिवूमध्ये वर्चस्व निर्माण केलं आहे ते अनोख्या शैलीमुळे. रेडिओ जॉकी ते अभिनेता असा त्याचा आजवरचा प्रवास थक्क करणारा आहे. मेनस्ट्रिम अॅक्टिंगला तोड देत त्य़ाने चौकटीबाहेरच्या भूमिका साकारल्या. प्रेक्षकांच्या मनात घर करण्यास त्याला यश आले आहे. राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यातही त्याने ठसा उमटवला. 'अंधाधुन' या चित्रपटाने आयुषमानला राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला. आज 'अंधाधुन' ला एक वर्ष पूर्ण झालं आहे आणि त्यानिमित्ताने आयुषमानने मत व्यक्त केलं आहे.

आयएएनएस (IANS) ला दिलेल्या मुलाखतीत आयुषमान म्हणाला,' कलाकाराच्या पेशाने मी नेहमीच एक विद्यार्थी आहे जो सतत अभिनय शिकण्याचा प्रयत्न करत आहे. मी अशा चित्रपटांच्या शोधात असतो जे मला अधिक चांगल बनण्यासाठी मदत करतात, माझ्या विचारांना आव्हान देतात, माझा विश्वास आणि मला नव्या गोष्टी शिकण्यासाठी भाग पाडतात. अंधाधून या चित्रपटाने मला अभिनेता म्हणून घडवलं आहे.'

पुढे तो म्हणाला,' माझ्या नकारात्मक गोष्टींना आव्हान देत या चित्रपटाने मला खूप काही शिकवलं आहे. शिवाय माझ्यातील एका वेगळ्या बाजूला माझ्यासमोर आणि प्रेक्षकांसमोर आणलं आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक श्रीराम रघुरावन यांचे मी आभार मानतो कारण त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला.'

आय़ुषमानचे नुकतेच ड्रिम गर्ल, आर्टीकल 15, शुभ मंगल सावधान, बधाई हो, बरेली की बर्फी असे ब्लॉकबस्टर चित्रपट प्रदर्शित झाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

Youth Sena Leader Car Crash: युवासेना पदाधिकाऱ्याच्या थारची दुचाकीला धडक; कामगार गंभीर जखमी, खर्च न दिल्याचा आरोप करत गुन्हा दाखल

Dr. Ratnakar Mahajan Pass Away: ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. रत्नाकर महाजन यांचे निधन; महाराष्ट्रातील पुरोगामी, वैचारिक चळवळीतील अभ्यासू आवाज हरपला

Marathi News Live Updates: गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी पुणेकरांची बाजारपेठेत गर्दी

Karad Chain Snatching: रेकॉर्डवरील गुन्हेगारावर ‘जॅक’ पडला भारी; कऱ्हाडमध्ये उसातून शोधला सोनसाखळी चोर, श्वानाने काढला माग

SCROLL FOR NEXT