Angelina Jolie  Esakal
मनोरंजन

Angelina Jolie: हॉलिवूड सोडण्याच्या तयारीत अँजेलिना जोली! म्हणाली,..

अँजेलिनाने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयात एक खास स्थान निर्माण केले आहे.

Vaishali Patil

Angelina Jolie opens up on her divorce from Brad Pitt: हॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये अँजेलिना जोलीचे नाव आवर्जून घेतले जाते. तिच्या चाहत्यांची संख्या काही कमी नाही. तिने स्वत:च्या जोरावर हॉलिवूडमध्ये वेगळे स्थान निर्माण केले आहे.

सध्या अँजेलिना जोली तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. काही काळापूर्वी तिने ब्रॅड पिटपासून घटस्फोट घेतला . तर आता अँजेलिना ही हॉलिवूड सोडण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.

अँजेलिनाने अलीकडेच मीडियाशी संवाद साधला आहे. तिने यावेळी खुलासा केला की ती लॉस एंजेलिसमधून बाहेर पडण्याचा विचार करत आहे. ब्रॅड पिटपासून घटस्फोट आणि तिच्या कुटुंबाशी संबंधित कायदेशीर लढाईमुळे ती एलए सोडण्याचा विचार करत आहेत.

यावेळी तिने सांगितले की, जर तिला आज तिला तिच्या करिअरची सुरुवात करायची असती तर ती अभिनेत्री बनली नसती. जेव्हा तिने अभिनय करायला सुरुवात केली तेव्हा गोष्टी वेगळ्या होत्या. आजच्या काळात तिला अभिनय करायला नक्कीच आवडेल, पण त्यात ती कधीच करिअर करणार नाही.

अँजेलिना म्हणाली, 'मी आज अभिनेत्री होणार नाही. मी जेव्हा माझ्या करिअरला सुरुवात करत होते तेव्हा मला माहित नव्हते की मला इतक्या गोष्टी सार्वजनिक कराव्या लागतील. मी याची अपेक्षा केली नव्हती.

कारण मी हॉलीवूडच्या आसपास वाढले होते. माझ्यावर त्याचा प्रभाव पडला नाही. मला ते कधीच महत्त्वाचे वाटले नाही. एलए सोडण्याबद्दल बोलताना ती म्हणाली म्हणाली, 'माझ्या घटस्फोटानंतर जे घडले त्याचा हा एक भाग आहे.

अँजेलिनाने हॉलिवूड सोडण्यामागे अब्रॅड पिटपासून घटस्फोट घेण्याला कारणीभूत ठरवले. माझ्या घटस्फोटानंतर जे घडले त्याचाच हा एक भाग असल्याचे तिने सांगितले.

अँजेलिनाने तिच्या प्रकृतीबद्दल सांगतिले, "माझे शरीर तणाव सहन करू शकत नाही. माझ्या रक्तातील साखरेची पातळी सतत वर-खाली होत राहते. घटस्फोटाच्या सहा महिन्यांपूर्वी मला बेल्स पाल्सी झाला होता. लॉस एंजेलिसमध्ये तिचे कोणतेही सामाजिक जीवन नाही. मीडियामुळे ती बाहेर जाणे टाळते."

तिने पुढे खुलासा केला की ती लॉस एंजेलिस सोडल्यानंतर तिला कंबोडियातील तिच्या घरी राहायला आवडेल. अँजेलिनाचा माजी पती ब्रॅड पिट यानेही घटस्फोटानंतर त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील अडचणींबद्दल सांगितले आहे. वेगळं झाल्यानंतर दोघांच्याही आयुष्यावर वाईट परिणाम झाला.अँजेलिना आणि पिट हे हॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेले जोडपे होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

फक्त दीड लाख लोकसंख्या असलेला देश फीफा वर्ल्डकपसाठी पात्र; प्रशिक्षकाच्या अनुपस्थितीत घडवला इतिहास

PMPML Buses : पुणेकरांसाठी मोठी बातमी! पीएमपीच्या ताफ्यात ४ महिन्यात येणार २००० नवीन बस; प्रवासीसंख्या २० लाखांवर नेण्याचे लक्ष्य

Malegaon News : मालेगाव जन्मदाखला घोटाळा: १ हजार २७३ दाखले रद्द, ५०० नागरिक गायब; २४ जणांनी परदेशात पलायन केल्याचा किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

Latest Marathi Breaking News Live Update : पुण्यात कोयता गँगचा धुमाकूळ, रेस्टॉरंट आणि बारमध्ये घुसून राडा

IND vs SA: गौतम गंभीरला प्रशिक्षकपदावरून काढून टाकायचं का? सौरव गांगुली म्हणतोय, ' याक्षणी तरी...'

SCROLL FOR NEXT