Angus Cloud Euphoria star is dead at 25 after depression of his father SAKAL
मनोरंजन

Angus Clowd: वडिल जाण्याच्या डिप्रेशनने घेतला अभिनेत्याचा जीव.. वयाच्या अवघ्या २५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

अँगस क्लाउडचे वयाच्या 25 व्या वर्षी निधन झाले आहे

Devendra Jadhav

Angus Clowd Passed Away News: 'युफोरिया' या गाजलेल्या सिरीजमधील स्टार अभिनेता अँगस क्लाउडचे वयाच्या 25 व्या वर्षी निधन झाले आहे. क्लॉड HBO मधील मालिका युफोरियामधील त्याच्या अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी, 31 जुलै रोजी कॅलिफोर्नियातील त्याच्या राहत्या घरी निधन झाले.

वडीलांच्या निधनानंतर होता डिप्रेशनमध्ये

सर्वाधीक एमी पुरस्कार विजेत्या युफोरिया सिरीजमध्ये लॅकोनिक ड्रग डीलरची भूमिका अँगसने साकारली होती. अँगसचा मृत्यु कसा झाला याचे कोणतेही कारण अद्याप दिले गेले नाही. पण वडिलांच्या निधनानंतर अँगस मानसिक आजारातून जात होता, असा खुलासा झालाय.

अँगस क्लाउडच्या निधनाने कुटुंबाला धक्का

अँगस क्लाउडच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबाला धक्का बसला आहे. सोशल मीडियावर अभिनेत्याच्या मृत्यूची माहिती देताना कुटुंबाने निवेदन केलं की- "अँगस आता त्याच्या वडिलांना भेटायला अनंतात विलीन झालाय. अँगस हा त्याच्या बाबांचा चांगला मित्र होता. अँगसने त्याच्या मानसिक आरोग्यासोबतच्या लढाईबद्दल खुलेपणाने सांगितले. आणि आम्हाला आशा आहे की, त्याचे निधन इतरांना सांगेल की डिप्रेशनमध्ये तुम्ही एकटे नाहीत आणि ही लढाई एकटेपणाने लढू नये."

युफोरियाच्या भुमिकेसाठी अजरामर

'युफोरिया' ही अॅंगस क्लाउडची अभिनेता म्हणून सिरीज होती. मिडीया रिपोर्टनुसार, अॅंगस न्यूयॉर्कच्या रस्त्यावर त्याच्या मित्रांसह हँग आउट करत होता जेव्हा कास्टिंग डायरेक्टरने त्याला पाहिले आणि त्याला 'युरोफिया'साठी कास्ट केले. आणि पहिल्याच सिरीजमधुन त्याने अभिनयाची छाप पाडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump wishes Modi : ट्रम्प यांनी केला मोदींना फोन दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा अन् म्हणाले...

High Court Decision : उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! अवैध विवाह संबंधातून जन्मलेल्या मुलाला वडिलांच्या मालमत्तेत वाटा मिळण्याचा हक्क

Athletics Championships: छत्रपती शिवाजी महाराज की जय! चीनमध्ये सर्वेश कुशारेची जागतिक मैदानी स्पर्धेत अभिमानास्पद कामगिरी

Israel-Gaza War: इस्राईलकडून गाझा शहरात लष्करी कारवाईला सुरुवात; नागरिकांना दक्षिणेकडे निघून जाण्याचं आवाहन

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

SCROLL FOR NEXT