Anicka Vikramman Esakal
मनोरंजन

Anicka Vikramman: 'तो मारहाण करायचा अन् त्यानं ...'अभिनेत्रीचे बॉयफ्रेंडवर गंभीर आरोप! मारहाणीचे Photo Viaral

तामिळ चित्रपट अभिनेत्री अनिका विजय विक्रमन हिने तिच्या दुखापतींचे फोटो शेअर केले असून, तिच्या माजी प्रियकरावर हल्ला आणि शारीरिक शोषणाचा आरोप केला आहे

सकाळ डिजिटल टीम

दक्षिणेतील लोकप्रिय अभिनेत्री अनिका विजय विक्रमण तिच्या फोटोंमुळे खूप चर्चेत असते. अलीकडे, अनिकाने सोशल मीडियावर तिचे सुजलेले डोळे आणि जखम दिसणारे काही फोटो शेअर केली आहेत, ज्याने चाहत्यांना गोंधळात टाकले आहे. ही छायाचित्रे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. अनिकाची ही अवस्था कशी झाली असा प्रश्न तिचे चाहते विचारत आहेत. मात्र याचं उत्तरही तिने तिच्या पोस्टमध्ये दिलं आहे.

अनिका विजयी विक्रमनं शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिच्या डोळ्यासह चेहऱ्यावर आणि शरीराच्या इतर भागावर गंभीर जखमांच्या खुणा दिसत आहेत. डोळ्यांची अवस्था अशी आहे की पाहिलंही जात नाही आहे.

अनिकाने माजी प्रियकर अनूप पिल्लईवर मारहाण आणि शारीरिक शोषणाचा आरोप केला आहे. तो तिला सतत धमक्या देत असून कुटुंबाच्या सन्मानावरही चिखलफेक करत आहे.

अनिकाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले, 'माझ्यासोबत पूर्वी जे काही झाले ते सोडले असूनही, मला सतत धमकीचे फोन येत आहेत. माझ्या कुटुंबावर सातत्याने चिखलफेक होत आहे. तिने पुढे लिहिले की, 'मी दुर्दैवाने अनूप पिल्लई नावाच्या व्यक्तीला डेट करत होते, पण त्याने माझा मानसिक आणि शारीरिक छळ केला. त्याच्यासारखा माणूस मी पाहिला नाही. एवढे करूनही तो मला धमक्या देत आहे. मी स्वप्नातही विचार केला नव्हता की तो असे कधी करेल.

अनिकाने पुढे लिहिले, 'जेव्हा त्याने मला पहिल्यांदा मारहाण केली तेव्हा आम्ही चेन्नईत होतो. मग तो माझ्या पाया पडून रडू लागला. त्याला माफ केलं कारण मी मूर्ख होते. बंगळुरूला असताना दुसऱ्यांदा मारहाण झाली. त्यानंतर मी पोलिसांत तक्रार केली. मात्र त्याने पोलिसांना पैसे खाऊ घातले. त्यांनी आम्हाला आपापसात प्रकरण मिटवायला सांगितले. यामुळे त्याला पुन्हा माझ्यावर हल्ला करण्याची हिंमत मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT