A-confused-Aniket-Vishwasra 
मनोरंजन

अनिकेत विश्वासरावचे 'पॅडेड की पुशअप'द्वारे वेबसीरिजमध्ये पदार्पण

सकाळवृत्तसेवा

मुंबई : सिनेमा आणि टेलिव्हिजनवर विविध भूमिका साकारल्यानंतर अनिकेत विश्वासराव आता हंगामा प्लेवरील ओरिजनल मराठी शो 'पॅडेड की पुशअप'मध्ये एकाअंतर्वस्त्र विक्रेत्याच्या भूमिकेत दिसणार आहे. पॅडेड की पुशअप या विनोदी सीरिजमध्ये तेजश्री प्रधान, किशोरी अंबिये आणि सक्षम कुलकर्णीही मुख्य भूमिकेतझळकणार आहेत. अनिकेतने साकारलेला आदित्य हा एक मध्यमवर्गीय तरुण आहे. कोणत्याही प्रकारची माहिती नसताना अंतर्वस्त्र विकण्याचं आपलं कामत्याला सुरूच ठेवावे लागणार आहे. त्याचवेळी, आपण हे काम करतोय हे आपल्या बायकोपासून लपवून ठेवायचं आहे आणि सासूच्या संशयी शोधक नजरेपासूनही वाचायचं आहे!

अनिकेत विश्वासराव म्हणाला, "गेल्या काही काळात माझ्यासमोर आलेल्या कथांमध्ये 'पॅडेड की पुशअप' ही सगळयात आगळीवेगळी कथा आहे. आपल्याकामात यशस्वी होण्यासाठी शक्य ते सर्व काही करतानाच बायको आणि सासूपासून हे गुपित लपवून ठेवायचं अशी दुहेरी कसरत या अंतर्वस्त्र विक्रेत्याला करावीलागणार आहे. यातून प्रचंड विनोदी घटना घडतात आणि त्यामुळे प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन होणार आहे. कॅफेमराठी आणि हंगामा प्लेसोबत डिजिटल शोकरताना मला फारच आनंद झाला. या माध्यमामुळे मला एक प्रकारचं स्वातंत्र्य मिळालं, अशा कथेचा भाग बनता आलं जी इतरत्र पाहता येणार नाही."

हंगामा डिजिटल मीडिया आणि कॅफे मराठीची निर्मिती असलेल्या पॅडेड की पुशअपचे दिग्दर्शन आकाश गुरसाळे यांनी केले आहे. ही सीरिज डिसेंबर 2018 पासून हंगामा प्लेवर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Heavy Rain: पुण्यात मुसळधार पाऊस! रस्त्यांना नद्यांचं स्वरुप, वाहतूक ठप्प; पुणेकर खोळंबले

Hyderabad Gazette : मराठा समाजाला दिलासा! ‘हैदराबाद गॅझेट’ विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

Girl Period Problems: बाहेरून मुलगी, आतून मुलगा? १७ वर्षांची झाली तरी पीरियड्स आले नाही म्हणून तपासणी केली अन् सत्य आलं समोर

Education News : टीईटी परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास नोकरी सोडावी लागणार; शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण

Latest Maharashtra News Updates : अक्कलकोट तालुक्यात ओला दुष्काळाची स्थिती – जयकुमार गोरे

SCROLL FOR NEXT