anil kapoor corona positive fake report Sonam Kapoor angry on social media jounalism 
मनोरंजन

माझ्या वडिलांचा खोटा रिपोर्ट तयार केला, हे सगळे कशासाठी ?

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - अमुक सेलिब्रेटीला कोरोनाची लागण झाली त्यांना क्वोरांईनटाईन करण्यात  आले आहे.अशा प्रकारच्या बातम्या प्रसारमाध्यमांतून प्रसारित होत असतात. आता यापैकी कित्येक बातम्या या ऐकीव माहितीवर आधारित असल्याने त्यामुळे संबंधित रुग्णाच्या नातेवाईकांना मोठया त्रासाला सामोरं जावं लागत असल्याचे दिसून आले आहे. असाच एक प्रकार अभिनेत्री सोनम कपूरच्या बाबतीत घडला आहे. यावरुन तिनं अशाप्रकारच्या खोट्या बातम्या देणा-यांवर टीका केली आहे.

बॉलिवूडमधील प्रख्यात अभिनेता अनिल कपूर यांना कोरोनाची लागण झाली अशा प्रकारच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे कपूर कुटूंबीय कमालीचे त्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे अनिल कपूर यांच्या नावानं खोटा रिपोर्ट तयार करण्यात आला होता. तो देखील व्हायरल झाल्यानं अनिल यांची डोकेदुखी वाढली होती. त्यावरुन रागाला गेलेल्या सोनमने अशा प्रकारचे खोटे वृत्त पसरविणा-यांवर सडकून टीका केली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना ती म्हणाली, आपल्याकडे कुठलेही ठोस पुरावे नसताना अशा प्रकारच्या चुकीच्या बातम्या देणे धोकादायक आहे. मी लंडनमध्ये आहे आणि मी माझ्या वडिलांशी बोलण्यापूर्वीच काही मीडियातून चुकीची माहिती पसरवली जात आहे. कृपया पत्रकारीता जबाबदारीने केली जावे असे आवाहन तिनं केलं आहे.

बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरची कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याच्या खोट्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यानंतर अनिल कपूरने स्वत: ट्विट करुन त्याविषयी माहिती दिली आहे. कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला असून सोशल मीडियावर पसरणाऱ्या बातम्या फोल असल्याचे अनिल कपूरने ट्विटमध्ये सांगितले आहे.  

अनिल कपूर चंदीगढमध्ये वरुण धवन, कियारा आडवाणी आणि नीतू सिंगसोबत 'जुग जुग जियो'चे शूटिंग करत होते. या चित्रीकरणादरम्यान, नीतू सिंग आणि दिग्दर्शक राज मेहता यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे खळबळ उडाली आणि शूटिंग थांबवण्यात आले.

अनिल कपूरने ट्विटमध्ये  म्हटले आहे की, "अफवांना पूर्णविराम देण्यासाठी सांगतो की, माझा कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. तुमच्या काळजी आणि शुभेच्छांसाठी आभारी आहे." राज मेहता दिग्दर्शित ‘जुग जुग जिओ’ हा चित्रपट एक  विनोदी चित्रपट आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP MLA: "वर्गात 'येस सर' ऐवजी 'जय श्री राम' म्हणा..." ; भाजप आमदाराच्या वक्तव्यामुळे वाद!

Parner Accident: भरधाव डंपरखाली दुचाकीस्वार ठार, पारनेर तालुक्यात भीषण अपघात, पोयटा वाहतूक करणाऱ्या डंपरने युवकाला चिरडले

Gold Rate Today: सोन्याच्या तेजीला ब्रेक! उच्चांकापासून 21 हजारांनी स्वस्त; दर आणखी कमी होणार? जाणून घ्या आजचा भाव

ज्युनिअर एनटीआरची मुख्य भूमिका असलेल्या ड्रॅगन सिनेमाची केली घोषणा; पुन्हा एकदा देशभक्तीपर सिनेमात करणार काम

Sangamner Accident: पोहण्याचा आनंद ठरला काळ; दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू, दगडाच्या खाणीत पोहायला गेले अन् परतलेच नाहीत

SCROLL FOR NEXT