मनोरंजन

Anil Kapoor:खबरदार, अनिल कपूरचा आवाज वापरलात तर! अभिनेत्यानं ठोठावलं कोर्टाचं दार

अनिल कपूर यांनी कोर्टात याचिका दाखल केली. ज्यामध्ये त्यांनी त्यांचा आवाज आणि फोटो वापरणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.

Manoj Bhalerao

Anil Kapur: भारतीय सिनेसृष्टीतील अनिल कपूर हे एक महत्वाचं नाव आहे. लोक त्यांनां त्यांच्या आवाजावरुन आणि चालण्याच्या स्टाईलवरुन ओळखतात. अनेक कॉमेडी शोमध्ये अनिल कपूर यांची मिमिक्री केली जाते. ज्यामुळे लोक लोटपोट होतात.

मात्र, आता अनिल कपूर यांच्या परवानगी शिवाय त्यांचा आवाज किंवा त्याच्याशी निगडीत कोणतीही गोष्ट करता येणार नाही. कारण, अभिनेते अनिल कपूर यांनी कोर्टात याबद्दल याचिका दाखल केली होती. त्यांनी उच्च न्यायालयात अर्ज केला की त्याच्या परवानगीशिवाय त्याचं नाव, त्याचा आवाज, त्याची सही, फोटो किंवा अशी कोणतीही गोष्ट जी त्याच्याशी जोडली गेलेली आहे, याच्या अनाधिकृत वापरावर अनिल कपूरने बंदी घालण्याची विनंती केली आहे.

डिजीटल युगात नवनवे ब्रँड्स निर्माण होत आहेत. काही ब्रँड आपली ओळख निर्माण करण्यासाठी अभिनेत्याचे फोटो त्यांच्या पवानगीशिवाय वापरत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे अभिनेता आणि निर्माता अनिल कपूरने त्याच्या प्रसिद्धी/व्यक्तिमत्व अधिकारांचे रक्षण करण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात दावा दाखल केला.

आपल्या फोटोचा होणारा गैरवापर याबद्दल करण्यात आलेल्या दाव्यात अनिल कपूर म्हणाले की, "मी माझे नाव, प्रतिमा, आवाज आणि माझ्या व्यक्तिमत्त्वाच्या इतर गुणधर्मांसह माझ्या व्यक्तिमत्त्वाच्या अधिकारांच्या संरक्षणासाठी माझे वकील श्री. अमित नाईक यांच्यामार्फत दिल्ली उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता. डिजिटल मीडियावर माझ्या फोटोंचा वापर होत होता."(Latest Marathi News)

न्यायमूर्ती प्रतिभा एम. सिंग यांनी निर्णय जाहीर केला, ज्यात सांगण्यात आलं की अनिल कपूरचे नाव, उपमा, आवाज किंवा त्याच्या ओळखीचे कोणतेही वैशिष्ट्य आयटम, रिंगटोन किंवा इतर उत्पादने तयार करण्यासाठी कोणीही वापरू शकत नाही.

अनिल कपूरच्या AKFCN निर्मित "थँक यू फॉर कमिंग" या चित्रपटाचा नुकताच टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रीमियर करण्यात आला आणि त्याला स्टँडिंग ओव्हेशन मिळाले. हा चित्रपट 6 ऑक्टोबर, 2023 रोजी रिलीज होणार आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: मनाेज जरांगेंचा मोठा निर्णय? १८व्या दिवशी मुंबईकडे निघण्याची तयारी; उपोषणस्थळी समर्थकांची गर्दी

Saundatti Dharwad Road Accident : बेळगावसाठी काळा दिवस! १५ तासांत ७ जणांचा मृत्यू; सौदत्ती-धारवाड मार्गावर भीषण अपघातात तीन मित्र जागीच ठार

Mumbai-Goa Highway Chemical Leak : मुंबई-गोवा महामार्गावर पुगाव हद्दीत ज्वलनशील रसायन वाहून नेणाऱ्या कंटेनरला अपघात; सर्व यंत्रणांच्या सतर्कतेमुळे गणेशोत्सवातील भीषण दुर्घटना टळली

Latest Marathi News Update : मनोज जरांगे पाटील ११ वाजता अंतरवाली सराटीतून मुंबईचे दिशेने रवाना होणार

टीम इंडियाने करंडक जिंकला, नक्वींच्या हातून ट्रॉफीही घेतली नाही; आता ACC अध्यक्षांच्या खुर्चीवर टांगती तलवार, पुन्हा निवड होणार का?

SCROLL FOR NEXT