मनोरंजन

बॉलीवूडमधल्या 'लखन भैय्याची' उसेन बोल्टसोबत जर्मनीत पार्टी

युगंधर ताजणे

मुंबई - आपल्या हटक्या अंदाजासाठी बॉलीवूडमध्ये अनिल कपूर (Anil Kapoor) यांची ओळख आहे. गेल्या काही दिवसांपासून ते वेगवेगळ्या कारणासाठी चर्चेत आले आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यासोबत त्यांच्या आलेल्या एके vs एके या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. आता ते पुन्हा वेगळ्या कारणासाठी चर्चेत आले आहे. त्याचे कारण म्हणजे त्यांनी जगप्रसिद्ध धावपटू उसेन बोल्ट याच्यासमवेत पार्टी केली आहे. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. अनिल कपूर यांच्या फॅन्सनं त्यांचे कौतूक केले आहे. उसेन बोल्ट (Usain Bolt) हा त्याच्या रनिंग आणि स्पीडसाठी प्रख्यात आहेत. मात्र त्याशिवाय तो नेहमी चर्चेत असणारा सेलिब्रेटी देखील आहे. सोशल मीड़ियावर अॅक्टिव्ह असणाऱ्या उसेननं यापूर्वी कित्येक सेलिब्रेटींसोबत पार्टीचे आयोजन केल्याचे दिसून आले आहे.

विशेष म्हणजे उसेन बोल्टनं देखील एक व्हिडिओ शेयर केला आहे. त्याचीही चर्चा सोशल मीडियावर आहे. वयाची साठी ओलांडली तरी अनिल कपूर यांचा अंदाज अद्याप तरुणांना लाजवणारा आहे. ते आपल्या उत्साहासाठी ओळखले जातात. तरुणांना कायम कार्यरत राहण्याचा सल्ला देणाऱ्या अनिल कपूर यांना काही वर्षांपूर्वी बॉलीवूडमधून लाईफ टाईम अचिव्हमेंट अॅवॉर्डही देण्यात आले होते. अनिल कपूर यांनी त्यांच्या सोशल मीडियावरुन काही व्हिडिओ शेयर केले आहेत. त्यात उसेन बोल्ट यांच्यासोबत पार्टी करतानाच्या व्हि़डिओला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याचेही दिसून आले आहे.

त्या पार्टीमध्ये उसेन बोल्ट, मोहम्मद फराह आणि त्यांचा मित्र परिवारही सहभागी झाला आहे. त्या पार्टीमध्ये अनिल कपूर यांचा वेगळा अंदाज दिसून आला आहे. त्यांनी पार्टीचे फोटो शेयर करताना लिहिलं आहे की, एका महान व्यक्तिमत्वासोबत घालवलेली रात्र ही कायम स्मरणात राहील यात कुठलीही शंका नाही. तो आणि मोहम्मद फराह याचाही त्यात उल्लेख करावा लागेल. दुसरीकडे उसेन बोल्टनं त्यांच्या इंस्टावरुन शेयर केलेल्या फोटोंसाठी एक कॅप्शन लिहिली आहे. त्यात तो म्हणतो, जर्मनीतील म्युनिकमध्ये केलेली पार्टी ही नेहमीच लक्षात राहणारी आहे. सगळ्या व्यक्तींसोबत व्यतीत केलेला वेळ हा मोठा आनंद देणारा होता. असेही त्यानं लिहिलं आहे. अनिल कपूर यांच्या प्रोजेक्टविषयी सांगायचं झाल्यास, ते जुग जुग जियो या चित्रपटामध्ये दिसणार आहेत. त्यात अभिनेत्री नीतु कपूर, वरुण धवन आणि कियारा अडवाणी हे कलाकार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT