Anil Kapoor reveals the reason behind the loss of films, Said, 'I still get rejected…’ Instagram
मनोरंजन

Anil Kapoor च्या वाट्याला आजही Rejection;म्हणाले,'एकच कारण देत कळवतात नकार'

अनिल कपूर यांचे नाव सिनेइंडस्ट्रीतील एव्हरग्रीन अभिनेत्यांमध्ये आवर्जुन घेतले जाते.

प्रणाली मोरे

(Anil Kapoor)अनिल कपूरचा 'जुग जुग जियो' सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. सिनेमानं चांगली कमाई केली आहे. बोललं जात आहे की, या सिनेमानं रिलीजनंतर तिसऱ्या आठवड्यात जगभरात बॉक्सऑफिसवर १०० करोडची कमाई केली. आपल्या एका मुलाखतीत अनिल कपूर यांनी वरुण धवन, कियारा अडवाणी, आणि नीती कपूर यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे. आपल्या स्ट्रगलिंगच्या दिवसांची आठवण करुन देत सिनेइंडस्ट्रीतील आपल्या प्रवासावर भाष्य करतानाच अनिल कपूर यांनी अनेक मुद्द्यांवर मोकळा संवाद साधला आहे.(Anil Kapoor reveals the reason behind the loss of films, Said, 'I still get rejected…’)

जुग जुग जियो सिनेमातील आपल्या भूमिकेची प्रशंसा केली गेली,सिनेमाला यश मिळालं याविषयी अनिल कपूर म्हणाले,'' ही खरंच मनला स्पर्शून जाणारी गोष्ट आहे. माझ्या भूमिकेचं कौतूक झालं, होतंय. हे खरंतर सोपं नव्हतं. सिनेमातील माझी भूमिका स्पष्ट होत नव्हती,जे कदाचित प्रेक्षकांनी स्विकारलं नसतं तर सिनेमासाठी नकारात्मक ठरलं असतं. मला माझं काम १०० टक्के द्यायचं होतं. सगळ्यात बेस्ट द्यायचं होतं. मला खरंच आनंद आहे की लोकांनी ती भूमिका समजून घेतली आणि तिच्याशी जोडले गेले''. अनिल कपूर यांनी आपल्याला चांगली भूमिका जुग जुग जियो मध्ये ऑफर केली यासाठी करण जोहर आणि राज मेहताचे आभार मानले.

जुग जुग जियो सिनेमाला 'हो' का म्हणालो याचं कारण स्पष्ट करताना अनिल कपूर पुढे म्हणाले की मला नेहमीच धर्मा प्रॉडक्शनसोबत काम करायचं होतं. मला यश जोहर यांच्यासोबत काम करायचे होते. जे शक्य झालं नाही. करण दोन दशकं इंडस्ट्रीत आहे आणि एक यशस्वी निर्माता आहे . पण त्याच्यासोबत देखील काम करण्याचा योग आतापर्यंत जुळून आला नाही. जेव्हा मला जुग जुग जियो ऑफर झाला तेव्हा मी लगेच त्याच्याशी जोडण्याचा निर्णय घेतला. एक वेगळी भूमिका साकारायला मिळणार खरंतर हे तो सिनेमा स्विकारण्या मागचे कारण होते.

याच मुलाखतीत अनिल कपूर यांनी आपल्याला अजूनही रिजेक्शनचा सामना करावा लागतो याचा खुलासा केला आहे. अनिल कपूर म्हणाले, ''मला आजही ऐकायला मिळते की मी एखाद्या सिनेमासाठी फिट नाही. माझं फिल्मी करिअर खूप चांगलं राहीलं खरंतर. लोकांच्या टीकेनं मला अधिक चांगलं काम करायला लावलं. जेव्हा कुणीतरी माझ्या सहकलाकरांनी माझ्यापेक्षा चांगले काम केले असे म्हणते ती गोष्ट देखील मला खूप काही शिकवून जाते. कुठल्या सिनेमात जेव्हा आजही मला सिलेक्ट केलं जात नाही. काही कारणं दिली जातात तेव्हा मी नाराज होत नाही. कारण मला विश्वास आहे माझ्या भविष्यावर. सध्या मी अॅनिमल, बिंद्रा, फायटर सारख्या सिनेमांत व्यस्त आहे'', असं अनिल कपूर म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Who Is Jamie Smith? टीम इंडियाची झोप उडवणारा जेमी स्मिथ कोण? ज्याने केलीय १५० धावांची ऐतिहासिक खेळी, मोडले अनेक विक्रम...

२५ वर्षांनी झी मराठीवर दिसणार लोकप्रिय अभिनेत्री, कधीकाळी ठरलेली गाजलेली नायिका; नव्या मालिकेतून करणार कमबॅक

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT