Anil Kapoor says he's 'on the top of the world' on becoming a grandfather: It's great to see him every day  sakal
मनोरंजन

आजोबा झाल्यानंतर कसं वाटतंय? अनिल कपूर यांनी सांगितला खास अनुभव..

सोनम कपूर यांनी 20 ऑगस्ट रोजी आपल्या बाळाला जन्म दिला, तेव्हा पासून अनिल कपूर यांना सर्व ठिकाणी त्यांच्या आजोबा होण्याबाबत विचारले जात आहे.

नीलेश अडसूळ

anil kapoor : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचा पती आनंद अहुजा यांनी 20 ऑगस्ट रोजी एका गोंडस बाळाला जन्म दिला. एक पोस्ट शेअर करत सोनम कपूरने चाहत्यांना ही गुडन्यूज दिली आणि बॉलीवुड सह चाहत्यांकडूनही शुभेच्छांचा वर्षाव झाला. यामध्ये अनिल कपूर आजोबा झाल्याने त्यांच्याकडे सर्वांचे विशेष लक्ष होते. त्यांच्यासाठी हा अत्यंत आनंदाचा दिवस होता. आजोबा होऊन कसं वाटतंय असं त्यांना सातत्याने विचारलं जातंय. पण हा अनुभव नेमका कसा आहे ते आज अनिल कपूर यांनी अत्यंत सुंदर शब्दात मांडला आहे.
(Anil Kapoor says he's 'on the top of the world' on becoming a grandfather: It's great to see him every day )

आजोबा होणे हे प्रत्येक वडिलासाठी आंनदाचा क्षण असतो. बॉलीवूडचे नवे आजोबा, अनिल कपूर, आपल्या नातवाच्या जन्माने अत्यंत आनंदित झाले आहेत. आजोबा झाल्यानंतर काय वाटतं हे आता अनिल कपूर यांनी सांगितले आहे. अनिल यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले 'आजोबा झाल्यानंतरचा अनुभव खुपच वेगळा आहे. आपण जगाच्या सर्वोच्च स्थानी असल्यासारखं वाटतंय. सध्या मी एका प्रोजेक्ट निमित्त व्यस्त असल्याने मुंचकीनसोबत म्हणजे आमच्या छोट्या नातवासोबत वेळ घालवनं शक्य होत नाहीय. पण त्यांची आजी म्हणजे माझी पत्नी सुनीता आणि मुलगी सोनम, जावई आनंद हे सर्व बाळाची काळजी घेत आहेत. मी प्रत्यक्ष त्याच्या सोबत नसलो तरी मी त्याच्या सोबतच आहे. त्याला दररोज पाहणे हे माझ्यासाठी सर्वात आनंददयी आहे.'

सोनमने (sonam kapoor) नुकतेच मातृत्व स्वीकारल्यामुळे तिचे जीवन आता कसे बदलेल याबद्दल खुलासा केला होता. सोनम म्हणाली होती, “मुल आलं की आपले प्राधान्यक्रम बदलतात. पण मला वाटतं की ते मुल जगात येणे हा आपला निर्णय आहे. आपण त्याला जन्म देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हा एक अतिशय स्वार्थी निर्णय आहे,' असे सोनम एका मुलाखतीत म्हणाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Winter Update : राज्यातील थंडी गायब की गारठा कायम राहणार? हवामान विभागाचा महत्त्वाचा अंदाज समोर

PIFF Mahotsav : ‘पिफ’ १५ जानेवारीपासून रंगणार; सुमारे १४० चित्रपट दाखविले जाणार

होता स्‍कार्फ म्‍हणून वाचला गळा! 'बिबट्याचा वृद्ध महिलेवर जीवघेणा हल्ला; गवतातून झडप, जिवाच्या आकांताने आरडाओरडा अन्..

सोलापूर जिल्ह्यात 2 वर्षात 1350 जणांचा अपघाती मृत्यू! दुपारी 4 ते रात्री 12 या वेळेत सर्वाधिक अपघात; ‘या’ 5 महिन्यात अपघाताचे प्रमाण जास्त

लाडक्या बहिणींना ‘ई-केवायसी’साठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत! महापालिकेत लाडक्या बहिणींचे मतदान आपल्यालाच मिळावे म्हणून भावी नगरसेवकांकडून मोफत ‘ई-केवायसी’ शिबिरे

SCROLL FOR NEXT