Sanjay Dutt-Arshad Warsi in Welcome 3: Esakal
मनोरंजन

Welcome 3: अनिल अन् नानांचा पत्ता कट? आता 'ही' हिट जोडी मजनू - उदय बनून करणार राडा!

वेलकम 3 या चित्रपटाबाबत एक अपडेट समोर आले आहे

Vaishali Patil

Sanjay Dutt-Arshad Warsi in Welcome 3: अक्षय कुमार अन् कतरिना कैफचा वेलकम हा आजही तितकाच सुपरहिट आहे. आजही हा चित्रपट प्रेक्षक आवडीने पाहतात. या चित्रपटात अक्षय अन् कतरिनाच्या जोडीपेक्षा नाना पाटेकर आणि अनिल कपूर यांच्या जोडीला प्रेक्षकांनी जास्त प्रतिसाद दिला.

वेलकमला मिळालेल्या भरपुर प्रतिसादानंतर नंतर 2015 मध्ये त्याचा दुसरा भाग रिलीज झाला. यात अक्षयचा पत्ता कट झाला मात्र अनिल कपुर अन् नाना पाटेकर यांची जोडी होती.

दरम्यान आता पुन्हा वेलकम प्रेक्षकांचं मनोरंजन करायला येत आहे. निर्मात्यांनी वेलकम 3ची घोषणा केल्यानंतर चाहते खुपच आनंदी झाले. मात्र आता या चित्रपटाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

अनिल कपूर आणि नाना पाटेकर यांना या चित्रपटातून काढण्यात आलं आहे. वेलकम 3 मध्ये अनिल कपूर आणि नाना पाटेकर दिसणार नसल्याचा दावा 'पिंकविला'ने दिलेल्या वृत्तात करण्यात आला आहे.

आता अनिल कपुर आणि नाना पाटेकर यांच्या जागी संजय दत्त आणि अर्शद वारसी हे या चित्रपटात दिसणार आहे. तर आनंदाची गोष्ट म्हणजे यात अक्षय कुमारचीही पुन्हा एंट्री करण्यात आली आहे. मजनू भाई आणि उदय शेट्टीच्या भूमिकेत संजय दत्त आणि अर्शद वारसी यांना प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पहावं लागेल.

वेलकममध्ये अक्षय कुमार दिसला होता. त्याच्या जबरदस्त कॉमेडीनं प्रेक्षकांचे खुप मनोरंजन केलं होतं. मात्र वेलकम बॅकमध्ये जॉन अब्राहम दिसला. आता पुन्हा अक्षय कुमार दिसल्याने चाहते खुश आहेत. वेलकम 3 चे दिग्दर्शन कोण करणार हे याची माहिती समोर आलेली नाही. त्याचबरोबर सुनील शेट्टी देखील या चित्रपटाचा भाग असणार असल्याचे बोललं जात आहे. अक्षय कुमार लवकरच ओह माय गॉड 2 हा चित्रपट 11 ऑगस्टला रिलीज होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबई सुरक्षेत चौथ्‍या स्‍थानावर! ‘राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण’चा अहवाल; सर्वाधिक गुन्हेगारी कोणत्या शहरात?

मुसळधार पावसाचा हाहाकार! पूल कोसळून ६ जणांचा मृत्यू, भूस्खलनामुळे रस्ते बंद

Kolhapur Tragedy : क्लासमध्ये ओळख, मैत्रिणीला कोल्हापुरातून उचललं; पंढरपुरात ४ दिवस कोंडलं, कोकणात नेलं पण तिथून पळून गेली अन्...

"त्यांची मी नक्कल केली पण त्यांनी..." संध्या यांच्या आठवणीत प्रिया यांची भावूक पोस्ट; "त्यांची पुन्हा भेट..'

Latest Marathi News Live Update: महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या विविध आघाड्यांच्या अध्यक्षांची कार्यकारणी जाहीर

SCROLL FOR NEXT