Anil Kapoor, Sunny Leone Google
मनोरंजन

वेलकम सिनेमातील 'ते' फेमस पोस्टर अखेर सनी लिओननं घेतलं विकत...

अनिल कपूर यांनी सोशल मीडियावरनं व्यक्त केले आभार...

प्रणाली मोरे

अक्षय कुमार,अनिल कपूर,नाना पाटेकर,कतरिना कैफ,फिरोझ खान,परेश रावल,मल्लिका शेरावत अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या 'वेलकम' सिनेमानं बॉक्सऑफिसवर चांगली कमाई केली. त्यावेळी 'वेलकम' पाहताना सिनेमातल्या प्रत्येक सीनवर थिएटरात टाळ्यांचा आणि हशाचा धुव्वा उडाला नाही तर नवल मानलं जायचं. या सिनेमात एकीकडे नाना पाटेकर आणि अनिल कपूरची अभिनयाची जुगलबंदी तर दुसरीकडे अक्षय-परेश रावलची अभिनयाची तोफ सिनेमाला एका वेगळया लेवलवर घेऊन गेली होती. या सर्वांसोबतच सिनेमातली आणखी एक गोष्ट आजतागायत लक्षात राहिली ती म्हणजे मंजू भाई या अनिल कपूर यांनी रंगवलेल्या भूमिकेची चित्रकला.

या सिनेमात अनिल कपूर यांनी रंगवलेल्या मंजू भाई या व्यक्तीरेखेनं काढलेलं चित्र आणि त्याचा झालेला लिलाव हे सारंच फार मजेदार होतं. 'घोड्यावर चढलेला गाढव' अशा त्या चित्राने हास्याचा धुव्वा उडवला होता. 'वेलकम २' काही वर्षांपूर्वी प्रदर्शित होऊन गेला, पण २००७ साली प्रदर्शित झालेल्या 'वेलकम' मधील ते चित्र आजही तितकचं चर्चेत आहे. आज अनेक वर्षांनी सनी लिओनने तिच्या ट्वीटर अकाऊंटवरनं तो फोटो शेअर करत पुन्हा जुन्या आठवणी जाग्या झाल्या. तिनं हे ट्वीट अनिल कपूर यांना टॅग केल्यानंतर त्यांनीही,' मंजूभाईचं हे चित्र सर्व जगात प्रसिद्ध झालंय' अशी कमेंट दिलीय. तर फॅन्सनीही 'वेलकम' सिनेमाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तर अनेक मीम्सही या पोस्टवर केल्या गेल्या आहेत त्याही मजेशीर आहेत.

वेलकम ३ आणि वेलकम ४ हे एकापाठोपाठ एक प्रदर्शित करण्याचा सिनेमाच्या निर्मात्यांचा मानस होता. आता सनीनं हे पोस्टर शेअर केल्यामुळे वेलकम ३ आणि वेलकम ४ निर्मितीच्या वाटेवर आहे की काय आणि सनी त्यात भूमिका करतेय का यावर चर्चा रंगू लागलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT