Animal Actor Bobby Deol  esakal
मनोरंजन

Bobby Deol : 'घरच्यांना कुठं माहिती होतं, मी 'आश्रम' च्या शुटींगला जातोय'! बॉबीनं सांगितलं मोठं सिक्रेट

बॉबीनं अॅनिमलमध्ये साकारलेली खलनायकाची भूमिका ही चाहत्यांचे, नेटकऱ्यांचे आणि समीक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.

युगंधर ताजणे

Animal Actor Bobby Deol : संदीप रेड्डी वांगाच्या अॅनिमलमधून प्रचंड लोकप्रिय झालेल्या बॉबीवर प्रेक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. करिअरच्या वेगळ्या टप्प्यावर असलेल्या बॉबीच्या वाट्याला आलेली लोकप्रियता ही सध्या चर्चेचा विषय आहे. त्यानं याविषयी विविध मुलाखतींमधून सांगितलेली गोष्ट चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

बॉबीनं अॅनिमलमध्ये साकारलेली खलनायकाची भूमिका ही चाहत्यांचे, नेटकऱ्यांचे आणि समीक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. त्याला कारणही तसेच आहे. बॉबीनं केलेला अभिनय. यापूर्वी प्रसिद्ध दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या आश्रम नावाच्या वेबसीरिजमध्ये बॉबीनं साकारलेली बाबाजींची भूमिका प्रेक्षकांना कमालीची आवडली होती. त्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता.

सोशल मीडियावर अॅनिमलच्या निमित्तानं बॉबीचे जे व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यात त्यानं चाहत्यांना धन्यवाद दिले आहे. माझ्यावर प्रेक्षकांचे, चाहत्यांचे जे प्रेम आहे ते पाहून आपण थक्क झालो. अशा प्रकारे जर तुमच्या भूमिकेचे ते कौतुक करत असतील तर आणखी काय हवं असतं एखाद्या कलाकाराला....अशी पोस्ट बॉबीनं केली होती. अबरारच्या भूमिकेला प्रेक्षकांनी दिलेला प्रतिसाद पाहून तो कमालीचा भावूक झाला होता.

आता एका मुलाखतीतून बॉबीनं त्याच्या करिअरमधील काही महत्वाच्या गोष्टींचा खुलासा केला आहे. त्यात त्यानं आश्रम वेबसीरिजविषयी एक किस्सा सांगितला आहे जो सध्या सोशल मीडियावरुन चर्चेत आला आहे. बॉबी म्हणतो की, मी आश्रम नावाच्या मालिकेमध्ये जी भूमिका साकारली त्याविषयी माझ्या कुटूंबियांना काहीही माहिती नव्हते. त्यांना न सांगता मी त्यामध्ये काम केले होते.

तुम्हाला खोटं वाटेल पण मी या मालिकेच्या शुटींगला घरी कुणालाही न सांगता जात होतो. त्याचे कारण माझ्या मनात असलेली भीती. ही मालिका प्रदर्शित झाल्यानंतर देखील मी खूप घाबरुन गेलो होतो. मला घरचे काय म्हणतील याचा विचार करायचो. अशा शब्दांत बॉबीनं त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

रणबीर आणि बॉबीच्या अॅनिमलच्या कलेक्शनविषयी सांगायचे झाल्यास त्यानं आतापर्यत तीनशे कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. रणबीरनं तर त्याच्या ब्रम्हास्त्रचा रेकॉर्ड ब्रेक केल्याचे सांगितले जात आहे. वर्ल्ड वाईड अॅनिमलच्या कलेक्शनविषयी सांगायचे झाल्यास त्यानं सहा दिवसांत पाचशे कोटींची कमाई केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाचे ढग; पुढील काही तास पावसाचा जोर टिकून राहण्याची शक्यता

Tukaram Mundhe Crackdown : मुंढेंच्या दणक्याने हॉटेल्सही 'सरळ'! आधी सिलिंडर, आता 'एफडीए'मुळे मेन्यूमध्ये कपात; पनीर, चीज, खवा 'गायब'च

Koyna Rain: शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार; ५० मिमीहून अधिक पावसाची नोंद

Fifa World Cup 2026 : घानाचा 'घाला'! तगड्या इंग्लंडला रडवले; २८ वर्ष, दुसरा सामना अन् परंपरा कायम, L गटात खतरनाक चुरस

Success Story: सामान्य कुटुंबातून असामान्य यश! यशवंत जगतापांची प्रेरणादायी कामगिरी; सरकारी भरती परीक्षांत यशाचा धडाका

SCROLL FOR NEXT