animal Bobby Deol's On-Screen Wife mansi taxak SHOCKING Statement About wedding assult scene  SAKAL
मनोरंजन

Animal Bobby Deol: बॉबीसोबत लग्नातल्या 'त्या' सीनवर अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली,"माझ्या लग्नात असं..."

'अ‍ॅनिमल' सिनेमातील लग्नातल्या 'त्या' सीनवर अभिनेत्रीने सोडलं मौन

Devendra Jadhav

Animal Movie News: रणबीर कपूरचा 'अ‍ॅनिमल' सिनेमा बॉक्स ऑफीसवर चांगलाच गाजतोय. प्रेक्षक - समीक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळूनही 'अ‍ॅनिमल'ने बॉक्स ऑफीसवर चांगली कमाई केलीय.

'अ‍ॅनिमल' सिनेमात एक प्रसंग चांगलाच लक्षात राहिला. तो म्हणजे, बॉबी देओल आपल्या लग्नात एकाला यमसदनी धाडतो आणि भर लग्नात बायकोसोबत मधुचंद्र देखील साजरा करतोयावेळी बॉबीच्या पत्नीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री मानसी टक्सक हिने तिचं मत व्यक्त केलंय. काय म्हणाली मानसी बघा.

झूम एंटरटेनमेंटशी बोलताना मानसी म्हणाली, “हे नक्कीच धक्कादायक आहे. बॉबी आणि माझे लग्न अशा प्रकारे संपेल अशी कोणीही अपेक्षा करत नाही. लग्नाचा प्रसंग सुरू झाला की, रोषणाई दिसून येते. सुंदर संगीत ऐकायला मिळतं. हे संगीत आणि त्यातील गाणं सध्या इंस्टाग्रामवर खूप व्हायरल झाले आहे. असं वाटतं शेवट चांगला होईल पण अचानक काहीतरी वेगळंच घडताना दिसते."

मानसी पुढे म्हणाली, "या प्रसंगातुन एक वेगळाच 'अ‍ॅनिमल' तुम्हाला दिसणार, हे प्रेक्षकांना सांगायचे होते; जर तुम्हाला रणबीर वेगळा वाटत असेल तर त्याच्यासमोर असलेला खलनायक किती भयंकर असेल याची कल्पना तुम्ही करू शकता. बॉबी सरांची क्रूर आणि हिंस्त्र भूमिका दाखवण्यासाठी तोच योग्य मार्ग होता.”

मानसी पुढे म्हणाली, “माझ्या लग्नात असं घडावं अशी माझी कधीच इच्छा नाही!”

मानसी शेवटी म्हणते, "'अ‍ॅनिमल' सिनेमात कधी काय घडेल काय सांगता येत नाही. जेव्हा बॉबी देओलला कळतं की त्याचा भाऊ मारला गेलाय. तेव्हा तो इमोशनल झोनमध्ये जातो. त्यामुळे त्या झोनमधून बाहेर येण्यासाठी आणि आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी तो आपल्या पत्नीकडे येतो. मला वाटतं नाही की, ही कोणत्याही प्रकारची बळजबरी नाही. मला ते सेटवर किंवा स्क्रिप्टमध्ये जाणवले नाही. ते फक्त दोन लोकांमधील नाते होते." असं मानसी म्हणाली.

'अ‍ॅनिमल' ची बॉक्स ऑफीस कमाई

'अ‍ॅनिमल' सिनेमाने Sacknilk रिपोर्टनुसार, रिलीजच्या सातव्या दिवशी 25.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या आकडेवारीसह अ‍ॅनिमल'ने एकूण सात दिवसात 338.85 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

अ‍ॅनिमल सिनेमात रणबीर कपूर, बॉबी देओल, रश्मिका मंदाना, तृप्ती डिमरी यांच्या भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT