Animal Box Office Collection Day 4:  Esakal
मनोरंजन

Animal Box Office Collection Day 4: विकेंड संपला अ‍ॅनिमल गाजला! चौथ्या दिवशीही पडला पैशांचा पाऊस! किती कोटींचा जमवला गल्ला?

संदीप रेड्डी वंगा यांच्या 'अ‍ॅनिमल' चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळत आहे.

Vaishali Patil

Animal Box Office Collection Day 4: दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांच्या 'अ‍ॅनिमल' चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळत आहे. एकीकडे या चित्रपटाला समिक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला असला तरी प्रेक्षकांचं मात्र या चित्रपटाला भरपूर प्रेम मिळत आहे.

रणबीर कपूर आणि बॉबी देओल स्टारर 'अ‍ॅनिमल' या चित्रपटाला देशातच नाही तर जगभरात चांगली पसंती मिळत आहे. प्रेक्षकांना हा सिनेमा खुपच आवडत आहे. याचा परिणाम चित्रपटाच्या कलेक्शनवरही होत आहे. अ‍ॅनिमलची कमाई दिवसेंदिवस वाढत आहे आणि चित्रपट नवीन रेकॉर्ड करत आहे.

रिलीजच्या अवघ्या 3 दिवसातच चित्रपटाने 200 कोटींचा टप्पा ओलांडला होता तर सोमवारी देखील चित्रपटाने बक्कळ कमाई केली. 'अॅनिमल'ने रिलीजच्या चौथ्या दिवशी म्हणजे सोमवारी किती कोटींचा व्यवसाय हे जाणुन घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

तर 'अ‍ॅनिमल'च्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर, चित्रपटाने रिलिजच्या पहिल्या दिवशी 63.8 कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी चित्रपटाची 66.27 कोटी रुपयांची कमाई केली होती. रविवारी 'अ‍ॅनिमल'ने 71.46 कोटींची कमाई होती.

तर आता चित्रपटाने रिलिजच्या चौथ्या दिवशी म्हणजे सोमवारी देखील चांगली कमाई केली. Sacknilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'Animal' ने सोमवारी 39.9 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

या सर्व आकडेवारीसह 'अ‍ॅनिमल'ने चार दिवसात बॉक्स ऑफिसवर एकूण 241.43 कोटींचा गल्ला जमवला आहे. या कमाईसोबत 'अॅनिमल'ने 'गदर 2', 'टायगर 3' आणि 'पठाण'चा रेकॉर्ड मोडला आहे.

बॉक्स ऑफिसवर 230 कोटींहून अधिक कमाई करणारा 'अ‍ॅनिमल' लवकरच 250 कोटींचा टप्पा पार ओलांडणार आहे.

संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित हा चित्रपट शुक्रवारी हिंदी, तेलगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित झाला आहे. यात रणबीर कपूर व्यतिरिक्त बॉबी देओल, रश्मिका मंदान्ना, तृप्ति डिमरी आणि अनिल कपूर यांनी 'अ‍ॅनिमल’मध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hockey World Cup, IND vs PAK: भारताकडून गोलचा पाऊस अन् पाकिस्तान आऊट! दणदणीत विजयासह हरमनप्रीतचा संघ पुढच्या फेरीत प्रवेश

Pune Crime: पुणं हादरलं! डोक्यात हातोडा घालून मित्रांनी काढला मित्राचा काटा; विरोधी पार्टीचं स्टेटस ठेवल्याचा राग

Marathi News Live Updates : जातनिहाय जनगणनेच्या बाबतीत अशा प्रकारची फसवणूक का केली जात आहे? - के. सी. वेणुगोपाल

Yamaha RayZR 125 ला नवा लूक! नवीन रंगांसह मिळणार TFT डिस्प्ले आणि नेव्हिगेशन स्मार्ट फीचर्सचा फूल धमाका

Jintur Rescue News: तीन वर्षांचा चिमुकला १५ फूट खोल बोअरवेलमध्ये अडकला; दोन तासांच्या प्रयत्नांनंतर सुखरूप बाहेर

SCROLL FOR NEXT