animal movie anil kapoor as balbir singh making bts video viral on social media  SAKAL
मनोरंजन

Animal Anil Kapoor: असा तयार झाला अनिल कपूर यांचा बलबीर सिंग? बघा पडद्यामागची मेहनत

'अ‍ॅनिमल' सिनेमात अनिल कपूर यांनी बलबीर सिंग यांची भूमिका साकारली आहे

Devendra Jadhav

Animal Movie Ranbir Kapoor: रणबीर कपूरचा 'अ‍ॅनिमल' सिनेमा सध्या बॉक्स ऑफीसवर चांगलाच गाजतोय. या सिनेमाने कमाईचे अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. रणबीरच्या अभिनयाचं खुप कौतुक होतंय. 'अ‍ॅनिमल' मधील सर्वच कलाकारांनी भन्नाट अभिनय केलाय. त्यातच जास्त चर्चा झाली ती म्हणजे अभिनेते अनिल कपूर यांची. अनिल यांनी रणविजयचे वडिल बलबीर सिंगची भूमिका साकारली. ही भूमिका साकारण्यासाठी अनिल यांनी पडद्यामागे कशी मेहनत घेतली बघूया.

असा तयार झाला 'अ‍ॅनिमल' मधला बलबीर सिंग?

'अ‍ॅनिमल' चित्रपटातील पडद्यामागचा हा व्हिडीओ पाहून अनिल यांची मेहनत दिसून येते. अनिल कपूर यांना या भूमिकेसाठी विशेष कष्ट करावे लागले असून त्यांनी व्हिडिओमध्ये संपूर्ण चेहऱ्याचा मुखवटा कसा घातला हे पाहायला मिळतं.

40 वर्षांपासून विविध चित्रपटांमध्ये अनिल कपूर यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. यावेळीही अनिल यांनी 'अ‍ॅनिमल' मधील दुहेरी भूमिकेसाठी खास प्रोस्थेटिक्सचा वापर केला.

'अ‍ॅनिमल'ची कमाई

'अ‍ॅनिमल' सिनेमाने बॉक्स ऑफीसवर रेकॉर्डब्रेक कमाई केलीय. 'अ‍ॅनिमल'ने आतापर्यंत जगभरात ६०० कोटींपेक्षा जास्त कमाई केलीय. 'अ‍ॅनिमल' सिनेमावर लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत असल्या तरीही 'अ‍ॅनिमल'ने कमाईच्या बाबतीत मोठ्या सिनेमांना मागे टाकलंय.

'अ‍ॅनिमल'ची तगडी स्टारकास्ट

संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित 'अ‍ॅनिमल' हा चित्रपट शुक्रवारी हिंदी, तेलगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित झाला आहे. यात रणबीर कपूर व्यतिरिक्त बॉबी देओल, रश्मिका मंदान्ना, तृप्ति डिमरी आणि अनिल कपूर यांनी 'अ‍ॅनिमल’मध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

High Court Decision : उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! अवैध विवाह संबंधातून जन्मलेल्या मुलाला वडिलांच्या मालमत्तेत वाटा मिळण्याचा हक्क

Athletics Championships: छत्रपती शिवाजी महाराज की जय! चीनमध्ये सर्वेश कुशारेची जागतिक मैदानी स्पर्धेत अभिमानास्पद कामगिरी

Israel-Gaza War: इस्राईलकडून गाझा शहरात लष्करी कारवाईला सुरुवात; नागरिकांना दक्षिणेकडे निघून जाण्याचं आवाहन

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

Beed Railway: बीडकरांची ४० वर्षांची स्वप्नपूर्ती! उद्यापासून अहिल्यानगर ते बीड 'रेल्वे'सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

SCROLL FOR NEXT