Animal Song Arjan Vailly: Esakal
मनोरंजन

Animal Song Arjan Vailly: रक्तपिपासू रणबीर! अ‍ॅनिमलच्या नव्या गाण्याने उडेल थरकाप!

Animal Song Arjan Vailly: अ‍ॅनिमल या चित्रपटातील अर्जन व्हॅली हे बहुप्रतिक्षित गाणे रिलीज झाले आहे.

Vaishali Patil

Animal Song Arjan Vailly: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या बहुप्रतिक्षित चित्रपट 'अ‍ॅनिमल'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाची भलतीच चर्चा आहे.

या चित्रपटाचा टिझर आणि गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत. त्यानंतर या चित्रपटाची उत्सुकता आणखीच वाढली आहे. त्यातच आता नुकताच बुर्ज खलिफावर चित्रपटाचा 60 सेकंदाचा टीझर दाखवण्यात आला.

त्यामुळे रणबीरचे चाहते खुपच आनंदी आहे. आता त्यातच निर्मात्यांनी चाहत्यांना आणखी एक ट्रिट दिली आहे. अ‍ॅनिमलचे नवीन गाणे रिलिज करण्यात आले आहे. या गाण्यात रणबीरचा खुपच खतरनाक अंदाज दिसत आहे. अर्जन व्हॅली असे या गाण्याचे नाव आहे.

3 मिनिटांचे हे गाणे या चित्रपटाच्या इतर गाण्यांपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे, ज्यामध्ये रणबीर कपूरचा खुपच खतरनाक लूक पाहायला मिळत आहे. मनन भारद्वाज आणि भूपिंदर बब्बल यांनी या गाण्याला आवाज दिला आहे. रणबीर या गाण्यात राउडी लूकमध्ये शत्रूंना मारत आहे.

सध्या हे गाणे सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे. रणबीरचा असा लूक यापुर्वी कोणीही पाहिला नसेल. चित्रपटातील हे गाणे चाहत्यांना खूप आवडत आहे. आता या गाण्यानंतर चित्रपटाबाबत उत्सुकता आणखीच वाढली आहे. त्यातच प्रेक्षकांना या चित्रपटाच्या ट्रेलरची उत्सुकता लागली.

अ‍ॅनिमल' चित्रपटात रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना यांच्यासोबत अनिल कपूर, बॉबी देओल आणि तृप्ती डिमरी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात अनिल कपूर रणबीरच्या वडिलांच्या भुमिकेत आहे. कबीर सिंग फेम संदीप रेड्डी वंगा यांनी 'अ‍ॅनिमल' दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट 1 डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT