Animal Movie Bobby Deol Abraar Khan character seque esakal
मनोरंजन

Animal Movie : 'रणबीरनं जरी गळा कापला असला तरी...' अ‍ॅनिमल २ च्या एंट्रीबाबत लॉर्ड बॉबीनं केलं मोठं भाष्य

सोशल मीडियावर लॉर्ड बॉबीचा चाहतावर्ग मोठा आहे. त्यानं केलेली कमाल प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

युगंधर ताजणे

Animal Movie Bobby Deol Abraar Khan character sequel : बॉलीवूडमध्ये सध्या दोन अभिनेत्यांची जोरदार चर्चा आहे. त्यांची नावं म्हणजे रणबीर कपूर आणि बॉबी देओल. संदीप रेड्डी वांगाच्या अॅनिमलमध्ये या दोन्ही अभिनेत्यांनी कमाल केली आहे. बॉबीला भलेही रणबीरच्या तुलनेत कमी स्क्रीनटाईम मिळाला असेल पण त्यानं जेवढा वेळ मिळाला आहे त्याचं सोनं केलं आहे.

सोशल मीडियावर लॉर्ड बॉबीचा चाहतावर्ग मोठा आहे. त्यानं केलेली कमाल प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून चाहत्यांनी बॉबीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. अॅनिमलनं बॉक्स ऑफिसवर देखील प्रचंड कमाई केली आहे. तीनशे कोटींचा टप्पा पार करुन हा चित्रपट येत्या काळात आणखी विक्रमी आकडा पार करेल असे बोलले जात आहे.

अशातच बॉबी देओल आणि अॅनिमलच्या दुसऱ्या भागाविषयीच्या चर्चांना उधाण आले आहे. बॉबी आणि रणबीरच्या त्या फायटिंग सीननं तर चित्रपटामध्ये आणखी रंगत आणली होती. दुसरीकडे अभिनेत्री तृप्तीच्या भूमिकेनं प्रेक्षकांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले होते. तिनंही ट्रोल करणाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. अशातच बॉबीच्या एका प्रतिक्रियेनं वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे.

अॅनिमलच्या दुसऱ्या भागात बॉबी दिसणार का यावरुन आता चर्चा सुरु झाली आहे. पहिल्या भागात केवळ पंधरा मिनिटांचा रोल मिळालेल्या बॉबीनं कमाल केली आहे. चाहत्यांना, प्रेक्षकांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले आहे. पहिल्या पार्टमधील बॉबीचा रोल्स संपल्यानंतर चाहते नाराज झाले आहेत. अॅनिमलच्या शेवटी त्याच्या सिक्वेलविषयी सांगण्यात आले आहे.

बॉबीनं या साऱ्याबाबत दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे. दिग्दर्शक संदीप वांगानं देखील अॅनिमलचा दुसरा भाग हा पहिल्यापेक्षा अधिकच डार्क असेल असे सांगितले आहे. बॉबीनं न्युज १८ ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये म्हटले आहे की, जर हार्ट रिप्लेसमेंट करुन रणबीर कपूर पुन्हा रणविजय बलबीर सिंह म्हणून पुन्हा येऊ शकतो तर अबरार खान पण कमबॅक करु शकतो.

प्रेक्षकांनी देखील अबरार खानला जुळी मुलं होणार असा अंदाज व्यक्त केला असून त्यातून ते पुन्हा बॉबीला सेकंड पार्टमध्ये घेऊन येतील. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावरुन बॉबीची लोकप्रियता दिसून येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Wari: कोरडिये काष्ठी अंकुर फुटले, येणे येथे जाले विठोबाचे; संतश्रेष्ठ भानुदास महाराजांनी पांडुरंगास हंपीतून आणले पंढरपूरला

Pune News : माता न तू वैरीनी! ३.५ लाखांसाठी ४० दिवसांच्या चिमुकली विकले...पुण्यातील धक्कादायक प्रकार

Thackeray Brothers : ठाकरे बंधू एकत्र आले, पण; कोल्हापुरात शिवसेना -मनसेचे मनोमिलन हेच मोठे आव्हान

Ashadhi Ekadashi 2025 : ऑस्ट्रेलियातील साधकांकडून वारीची साधना, माउलींच्या पालखी सोहळ्यात पूर्ण केली पायी वाटचाल; दोघे करणार परतवारी

Gahininath Maharaj: महाराष्ट्राची दक्षिण काशी असलेल्या पंढरपुरात सरकारने संतपिट स्थापन करावे : गहिनीनाथ महाराज

SCROLL FOR NEXT